निपाणी नगरी वृत्तसेवा (12)
“निपाणी कस्तुरबा बालभवन शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उद्या, मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी”
निपाणी – अशोक नगर, निपाणी (ता. निपाणी, जि. बेळगाव) येथील कस्तुरबा बालभवन येथे शैक्षणिक वर्ष 2025-26 निमित्त वार्षिक स्नेहसंमेलनाचा भव्य कार्यक्रम उद्या शुक्रवार दि. 13 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 6.00 वाजता आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रम स्थळ कस्तुरबा बालभवन, निपाणी येथेच असणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्षा श्रीमती सुहासिनी शरदकुमार दोशी असणार असून, चेअरमन सौ. सुनीता अनिल कोंडेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. सचिव श्री. अमृता पंकज पाटील यांनी कार्यक्रमाच्या नियोजनासाठी विशेष परिश्रम घेतले आहेत. तसेच हंचिनाळ येथील कामधेनु उद्योग समूहाचे संस्थापक,श्री. अनिल रामचंद्र कोंडेकर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
कार्यक्रमात रत्नशास्त्री व सामाजिक कार्यकर्ते श्री. ए.एच. उर्फ पप्पु मोतीवाला यांचा सत्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचा गौरव यावेळी करण्यात येईल.
प्रमुख उपस्थितीत श्री. अनिल मारुती कुरणे (माजी चेअरमन ब्रह्मनाथ मल्टी पर्पज दूध संघ, हंचिनाळ), श्री. रमेश बाळगोंडा पाटील (माजी चेअरमन ब्रह्मनाथ मल्टी पर्पज दूध संघ, हंचिनाळ), श्री. दर्शना प्रतीक शहा (संचालक, कस्तुरबा बालभवन, निपाणी), श्री. एस. बी. पाटील (C.E.O., कस्तुरबा बालभवन, निपाणी), श्री. प्रतिक शिरीष शहा (युवा काँग्रेस अध्यक्ष), श्री. सुनील शशिकांत वाडकर (साधक सनातन संस्था) तसेच युवा उद्योजक श्री. जितेंद्र शा. शहा आदी मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
कार्यक्रमाच्या रूपरेषेनुसार प्रमुख पाहुण्यांचे आगमन, स्वागत व प्रास्ताविक, सत्कार समारंभ, पाहुण्यांचे मनोगत आणि विद्यार्थ्यांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम असे आकर्षक सादरीकरण होणार आहे.
या स्नेहसंमेलनासाठी शाळेचे चेअरमन, मुख्याध्यापक, वर्गशिक्षक, विद्यार्थी प्रतिनिधी व सर्व विद्यार्थी यांच्याकडून जोरदार तयारी सुरू आहे. पालक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.