निपाणी नगरी वृत्तसेवा (12)
निपाणी प्रतिनिधी – शिवाजीनगर ५ वी गल्ली, निपाणी येथील रहिवासी हौसाबाई यल्लाप्पा मातीवड्डर (वय ७०) यांचे गुरुवार दिनांक १२ फेब्रुवारी रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने शिवाजीनगर परिसरासह संपूर्ण निपाणी शहरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
हौसाबाई या अत्यंत मनमिळाऊ व प्रेमळ स्वभावाच्या होत्या. परिसरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाशी त्या आपुलकीने संवाद साधत. कोणाच्याही दुःखात धावून जाणे आणि आनंदात सहभागी होणे हा त्यांचा स्वभावच होता. त्यामुळे त्या परिसरातील सर्वांच्या जिव्हाळ्याच्या होत्या.
त्यांच्या पश्चात तीन मुलगे, दोन मुली, जावई, सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. जनशक्ती चे संपादक संतोष मातीवड्डर यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या जाण्याने मातीवड्डर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरातील नागरिकांकडून कुटुंबीयांना सांत्वन व्यक्त करण्यात येत आहे.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, अशी प्रार्थना सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे. 🙏