निपाणी नगरी वृत्तसेवा..(14)
कर्नाटकातील सहकार क्षेत्रातील अग्रेसर व अग्रगण्य श्री महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द सहकारी नियमित निपाणी या संस्थेच्या गुरुवार पेठ निपाणी महिला शाखेचा 20वा वर्धापन दिन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महिला शाखा अध्यक्ष वृषाली परमणे व उपाध्यक्ष स्मिता दुमाले यांच्या हस्ते श्री महात्मा बसवेश्वर व सिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या प्रतिमेची पूजा करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
कार्यक्रमांमध्ये बोलताना शाखा अध्यक्ष वृषाली परमणे म्हणाल्या की आज गुरुवार पेठ महिला शाखेत 22 कोटी इतक्या ठेवी असून कर्ज वितरण 6 कोटी इतके झाले असून शाखेची उलाढाल 30 कोटी झाल्याचे सांगितले. आज शाखेमध्ये विविध योजना अमलात आणून सभासदांचे हित जोपासले आहे. त्यामध्ये जीवन विमा, जनरल विमा आरोग्य विमा. तात्काळ सोनेतारण कर्ज. विविध कर्ज योजना. डिजिटल मार्केटिंग मोफत एन.ई.एफ.टी, आर.टी.जी.एस, एस.एम.एस बँकिंग या प्रकारच्या सेवा सभासद वर्गांना बहाल करून शाखेचे नाव प्रगतीपथावर आणले आहे.
समाजामध्ये महिला पुरुषाच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून समाजामध्ये आपले कर्तव्य बजावत आहेत या शाखेच्या प्रगतीमध्ये महिला संचालक मंडळाचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे या शाखेचे नाव आज बेळगाव जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध झाले आहे. आज महिला संचालक मंडळ आपला पूर्ण वेळ संस्थेच्या प्रगतीसाठी देत आहेत याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो. तसेच सभासद व हितचिंतक ठेवीदार आणि कर्जदार यांचे शाखेला मोलाचे सहकार्य लाभले असल्यानेच हे सर्व शक्य असल्याचे सांगितले.
कार्यक्रमास संस्थेचे सहकाररत्न संस्थापक चेअरमन व व्हाईस चेअरमन डॉक्टर सी बी कुरबेट्टी तसेच संस्थेचे चेअरमन किशोर बाली, संचालक डॉक्टर एस आर पाटील, श्रीकांत परमणे, प्रताप पट्टणशेट्टी, सुरेश शेट्टी महेश बागेवाडी, अशोक लिगाडे, दिनेश पाटील, राजेश पाटील तसेच संचालिका पुष्पा कुरबेट्टी, विजया शेट्टी, सुवर्णा पट्टणशेट्टी सीईओ एस के आदन्नावर महिला शाखा संचालिका उमा पाटील, उमा बागेवाडी, वैशाली पाटील, मीनाक्षी लिगाडे, कल्पना कोठीवाले व असंख्य महिला सभासद व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार शाखेचे मॅनेजर व्यंकटेश कोरेगांवकर यांनी मानले.