निपाणी नगरी वृत्तसेवा..(30)
श्रीनिकेतन मराठी माध्यम शाळा तसेच शांतिनिकेतन मराठी माध्यम हायस्कूल निपाणी येथे वर्धमान महावीर जयंती साजरी करण्यात आली. यावेळी वर्धमान महावीरांच्या फोटोचे पूजन सर्व मान्यवर व शिक्षकांच्या हस्ते करण्यात आले. शाळेचे शिक्षक जितेंद्र कांबळे आपल्या मनोगतात भगवान महावीरांनी सत्य अहिंसा परमोधर्म हा विचार व जैन धर्माचा प्रसार सर्वत्र केला याबद्दल माहिती सांगितली शाळेच्या मुख्याध्यापिका सौ अलका भोसले यांनी आपल्या मनोगतात भगवान महाविरांच्या कार्याबद्दल माहिती दिली.
यावेळी हायस्कूलचे चेअरमन श्री कपूरचंद इंगळे, शाळेचे चेअरमन डॉ. अनिल ससे, शाळेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. चंद्रकांत कुरबेट्टी, ट्रस्टी श्री मिलिंद चौगुले, शाळेचे सेक्रेटरी श्री प्रदीप पाटील व सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अरुण शिंदे यांनी केले व आभार सौ अश्विनी खोत यांनी मानले.