ताज्या घडामोडी
कोरोना रूग्ण सेवेसाठी अपूर्वा मांडेचा सन्मान
तळेगाव : थोर समाजसेवक नथूभाऊ भेगडे पाटील कोविड सेंटर मध्ये राहून कोरोना रुग्णांची सेवा केल्याबद्दल अपूर्व मांडे हिचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने सन्मान करण्यात आला आहे.
अपूर्वा भारतीय जनता पार्टी तळेगाव दाभाडे युवती अध्यक्ष या पदावर कार्यरत आहे. सतत आठ दिवस कोविड सेंटर मध्ये राहात तिने ही रुग्णसेवा केली आहे. तिने केलेल्या या कामासाठी सर्व स्तरातून तिचे कौतुक व अभिनंदन होत आहे.