निपाणी नगरी वृत्तसेवा..(14)
श्री महावीर दिगंबर जैन बोर्डिंग ट्रस्ट संचलित निपाणी, श्री निकेतन कन्नड व मराठी माध्यम शाळा निपाणी व शांतिनिकेतन मराठी माध्यम हायस्कूल निपाणी या ठिकाणी मुलांच्या मध्ये असणाऱ्या विविध कौशल्याचा विकास करणारे M. S. F. C. या प्रशिक्षण वर्गाचा स्वाधीन यात्रा कार्यक्रम घेण्यात आला.
याप्रसंगी शांतिनिकेतन हायस्कूलचे चेअरमन श्री कपूरचंद इंगळे शाळेची ट्रस्टी श्री मिलिंद चौगुले श्री निकेतन शाळेचे चेअरमन डॉक्टर अनिल ससे शाळेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर चंद्रकांत बी कुरबेट्टी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ अलका भोसले सर्व शिक्षक वृंद विद्यार्थी विद्यार्थिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थित हा कार्यक्रम संपन्न झाला.
M. S. F. C. च्या वर्गाकडून मुलांनी तयार केलेल्या विविध वस्तूंच्या प्रदर्शनाचे उद्घाटन श्री मिलिंद चौगुले व डॉक्टर अनिल ससे यांनी केले. एम एस एफ सी च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ऊर्जा पर्यावरण, अभियांत्रिकी, पशुपालन व शेती, गृह व आरोग्य या चारही विभागाची पाहणी केली व मुलांनी बनवलेल्या वस्तूंची आणि पदार्थांची खरेदी केली.