देवचंद कॉलेज,अर्जुननगर मधील खेळाडूंची उत्कृष्ट कामगिरी!
निपाणी नगरी प्रतिनिधी (26)
छत्रपती संभाजीनगर येथे राज्यस्तरीय शालेय फेन्सिंग स्पर्धा पार पडल्या सदर स्पर्धेमध्ये श्रीष संदीप अनगळ सेबर प्रकारात सुवर्णपदक व ग्रुप इव्हेंट मध्ये सुवर्णपदक पटकावले.तर मंथन संदीप कांबळे इप्पी प्रकारात रौप्य पदक व ग्रुप इव्हेंट मध्ये सुवर्णपदक पटकावले.दोन्ही खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली, तर सातारा येथे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सातारा आयोजित, वेटलिफ्टिंग विभागस्तरीय स्पर्धेमध्ये 19 वर्षाखालील पृथ्वीराज रवींद्र चव्हाण 89 किलो वजन गटाखाली प्रथम , तर आदित्य सुरेंद्र तांबट 109 वजन गटाखाली प्रथम क्रमांक पटकावून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले.
त्यांना संस्थेचे अध्यक्ष, आशिषभाई शाह, उपाध्यक्षा तृप्ती भाभी शाह, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.जी.डी.इंगळे ,उप- प्राचार्य डॉ.पी.पी.शाह, कनिष्ठ विभागाच्या उप-प्राचार्या सौ. एस. पी.जाधव, पर्यवेक्षक डॉ.ए.एस.डोनर, जिमखाना प्रमुख डॉ.आर.जी.चव्हाण, क्रीडा शिक्षक निरंजन रवींद्र जाधव, प्रफुल्ल दुमाळ,वैभव सोनार,शिवदास चव्हाण व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले.