आंतरविभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेत देवचंद महाविद्यालयाचे सुयश.!
निपाणी नगरी प्रतिनिधी (28)
मोहनराव पाटील महाविद्यालय बोरगाव येथे नुकत्याच पार पडलेल्या शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर. आंतरविभागीय पुरुष व्हॉलीबॉल स्पर्धेत देवचंद महाविद्यालयाच्या मुलांच्या संघाने तृतीय क्रमांक पटकावला. बाद फेरीच्या पहिल्या सामन्यात सातारा उपविजयी संघाचा सलग दोन सेटनी तर दुसऱ्या सामन्यात सांगली विजेता के.बी.पी. कॉलेज इस्लामपूर संघावर 2-1 सेटनी मात केली, तर तृतीय क्रमांकाच्या सामन्यात विवेकानंद कॉलेज कोल्हापूर संघाचा 3-1 सेटनी पराभव केला.
विजयी संघातील खेळाडू पुढीलप्रमाणे
१. गजानन शिंगाडे,(कर्णधार)
२. अमन नाईकवाडे
३. इंद्रजीत मगदूम
४. बंदिश खोत
५. प्रथमेश साळुंखे
६. समीर पाटील
७. प्रणव पाटील
८. प्रथमेश यादव
९. विवेक साळोखे
१०. धैर्यशील खोत
११. आदित्य भाकरे.
संघाच्या या यशाबद्दल महाविद्यालयातील सर्व घटका मार्फत कौतुक होत आहे. विजयी संघाला जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आशिषभाई शाह, उपाध्यक्ष डॉ. सौ. तृप्तीभाभी शाह, संस्थेचे खजिनदार मा. सुबोधभाई शाह. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.सौ. जी. डी. इंगळे , उपप्राचार्य डॉ. पी.पी. शाह यांचे मोलाचे प्रोत्साहन लाभले. जिमखाना विभाग प्रमुख डॉ. रवींद्र चव्हाण, प्रा. निरंजन जाधव व्हॉलीबॉल प्रशिक्षक डॉ. भालचंद्र आजरेकर जिमखाना कर्मचारी वैभव सोनार व शिवदास चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले.