आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक
तायक्वांदो स्पर्धेत एम डी विद्यालयाचे यश!
निपाणी नगरी प्रतिनिधी (1) अर्जुननगर
येथील मोहनलाल दोशी विद्यालयाची खेळाडू धनश्री पाटील हिने सांगली येथे पार पडलेल्या विभागीय तायक्वांदो स्पर्धेमध्ये 46 किलोगटामध्ये प्रथम क्रमांक पटकाविला त्याबद्दल तिची पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली.
सदर यश मिळविल्या बद्दल समाजाच्या विविध स्तरातून तिचे कौतुक होत आहे. यशस्वी खेळाडूंना जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री आशिषभाई शाह यांच्यासह सर्व संचालकांचे प्रोत्साहन तर मुख्याध्यापिका एस एम गोडबोले यांच्यासह क्रीडाशिक्षक ए एच आळवे, व्ही व्ही पाटील यांचे मार्गदर्शन लाभले