निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कागल पोलिसांची धडक कारवाई – एकजण ताब्यात
निपाणी गोरक्षण सेवा समितीच्या सहकार्याने कत्तलीसाठी नेण्यात येणारी 18 वासरे, 34 रेडके पकडली!
निपाणी नगरी प्रतिनिधी (3)
कत्तलीसाठी चार दिवस व एक आठवडे वयाची 18 गायींची वासरे व त्याच वयाची म्हशींची 34 रेडके बेकायदेशीररीत्या टेम्पो व गोठ्यात ठेवली असल्याची माहिती गोरक्षण सेवा समिती निपाणीचे प्रमुख सागर श्रीखंडे यांना मिळाली. यावेळी कागल पोलीसांच्या मदतीने या वासरांची सुटका केली. यावेळी वासरांची तोंडे चिकटपट्टीने बांधलेल्या अवस्थेत मिळाली. ही सर्व जनावरे गोरक्षण सेवा समितीच्या कार्यकर्त्यांनी कागल पोलिसांच्या कडे स्वाधीन केली.
याप्रकरणी मोहम्मद हसन शेख (वय 39, रा. करनूर, ता. कागल) याला ताब्यात घेण्यात आले. याबाबतची फिर्याद गो-रक्षण सेवा समिती तर्फे कागल पोलिसात फिर्याद दिली. मोहम्मद शेख याने करनुर येथील जनावरांच्या गोठ्यात तसेच चार चाकी वाहनात 18 वासरे व 34 रेडके मिळून आली.
वासरांना तसेच रेडकांना चार चाकी वाहनाचे परमिट नसताना, मुक्या जनावरांची वैद्यकीय तपासणी न करता, काही वासरांच्या तोंडाला चिकटपट्टी बांधून कत्तल करण्यासाठी घेऊन जाण्यासाठी गाडीत व आपल्या गोठ्यात दाटीवाटीने बेकायदेशीररीत्या ठेवल्याचे आढळून आले.
ही कारवाई श्री विरूपाक्षलिंग समाधी मठाचे प.पू. प्राणलिंग स्वामीजी यांच्या मार्गर्शनाखाली झाली यावेळी प्राणलिंग स्वामीजी यांनी सदरील वासरांना पुढील संगोपनासाठी भगवान महावीर गोपालन सामाजिक सेवा संस्था कराड संचलित ध्यान फाउंडेशन गोशाळा घोलपवाडी येथे व्यवस्था केली.
सकल हिंदू समाज कोगनोळी, कागल येथील कार्यकर्ते यांनी केली यावेळी करनुर गावामध्ये तणावाचे वातावरण झाले होते. यावेळी समाधी मठाचे स्वामीजी यांनी सर्वांना आव्हान केले आहे की जनावरे सांभाळण्यासाठी काही अडचण असेल तर ती समाधी मठ गोशाळे मध्ये आणून द्यावीत. व अशी बेकायदेशीर घटना घडत असेल तर निपाणी गोरक्षक सेवा समितीशी संपर्क साधण्याचे आवाहन केले.