आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक
अभिनेत्री रिया नलावडेची मराठी चित्रपटात दमदार एंट्री!
निपाणी नगरी प्रतिनिधी (8)
अभिनेत्री रिया नलावडे सध्या तिच्या मनमौजी चित्रपटासाठी चर्चेत आहे. तिचा ‘मनमौजी’ हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. या आधी तिने यूपी 65, कॅडेट्स आणि सन्फ्लॉवर या वेबसीरिजमध्ये काम केले आहे. निपाणीच्या माजी नगराध्यक्ष नयनतारा नलवडे यांची ती नात आहे.
मनमौजी’ या रोमँटिक कॉमेडी असलेल्या चित्रपटात रिया मीरा नावाच्या प्रामाणिक आणि महत्त्वाकांक्षी मुलीची भूमिका साकारत आहे. जी श्री नावाच्या मुलाच्या कंपनीत पार्टनर म्हणून येते. श्रीला मुली आवडत नसतात आणि या दोघांमध्ये कसे मतभेद होतात आणि कसे प्रेम जुळते, हेच चित्रपटात पाहायला मिळेल.