शिवाजी विद्यापीठ आंतरविभागीय वेटलिफ्टिंग स्पर्धा उत्साहात संपन्न!
निपाणी नगरी प्रतिनिधी (9)
दिनांक सहा व सात नोव्हेंबर 2024 रोजी हर्क्युलस जिम अँड फिटनेस इन्स्टिट्यूट कुरुंदवाड या ठिकाणी शिवाजी विद्यापीठ आंतरविभागीय वेटलिफ्टिंग पुरुष /महिला स्पर्धा अतिशय उत्साहात संपन्न झाल्या. स्पर्धेचे आयोजन देवचंद महाविद्यालय अर्जुन नगर यांनी केले होते. स्पर्धेचे उद्घाटन पुणे येथील प्रसिद्ध उद्योगपती व ख्यातनाम वेटलिफ्टिंग प्रशिक्षक मा.श्री.गुरुदास पवार यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रदीप पाटील, डॉ. सुनील चव्हाण, निवड समितीचे चेअरमन डॉ. प्रशांत पाटील, निवड समिती सदस्य व स्पर्धा संयोजक डॉ. रवींद्र चव्हाण स्पर्धा निरीक्षक डॉ. महादेव सूर्यवंशी महाराष्ट्र वेटलिफ्टिंग असोसिएशनचे खजिनदार मा. सुरेश कुंभार इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेमध्ये 26 महाविद्यालयातून एकूण 27 पुरुष व 21 महिला खेळाडूंनी सहभाग घेतला होता. स्पर्धेतील विजयी खेळाडूंना मेडल्स व बुके देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेकरता प्रा. सुरेश कुंभार मा. प्रदीप पाटील, सौ. संजीवनी कुंभार, श्री स्वरूप प्रभाळे, श्री विजय तारे, श्री उत्तम मेंगणे, कु. श्रद्धा पवार,श्री.पद्मभूषण भरमगोंडा व प्रा.डॉ.रवींद्र चव्हाण यांनी पंच म्हणून काम पाहिले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आशिष भाई, उपाध्यक्ष डॉ.सौ. तृप्तीभाभी शाह, खजिनदार श्री.सुबोधभाई शाह तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.जी. डी. इंगळे, उपप्राचार्य डॉ. पी.पी .शहा हर्क्युलस जिमचे संचालक मा.श्री. प्रदीप पाटील यांचे प्रोत्साहन लाभले. तसेच स्पर्धा प्रमुख डॉ. रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हर्क्युलस जिममधील सर्व खेळाडू यांचे सहकार्य लाभले.