अंकुरम इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये “राष्ट्रीय संविधान दिन” उत्साहात साजरा!
निपाणी नगरी प्रतिनिधी (26)
26 नोव्हेंबर 2024 रोजी अंकुरम इंग्लिश मीडियम स्कूल कोडणी निपाणी येथे राष्ट्रीय संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली शाळेच्या मुख्याध्यापिका सौ चेतना चौगुले यांनी सर्वांना संविधान दिनाच्या शुभेच्छा देऊन संविधानाचे सविस्तर महत्व विशद केले. शाळेची विद्यार्थिनी कुमारी प्रज्ञा पाटील हिने भारतीय संविधानाचे सविस्तर विश्लेषण करून याची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना समजावून दिली. कुमारी सान्वी शहा हिने राज्यघटनेच्या सरनाम्याचे सविस्तर वाचन केले. व सर्व विद्यार्थ्याकडून सरनाम्याची पुनरावृत्ती करून घेण्यात आली. कार्यक्रमाच्या वेळी शिक्षिका शाहिस्ता सय्यद व सौ पौर्णिमा वंजारे यांनी संविधानाचे महत्त्व त्याची विभाग व फायदे, नियमावली व राष्ट्रीय एकात्मतेसाठी यांची गरज व त्याची अंमलबजावणी याविषयी सविस्तर चर्चासत्र आयोजित केले होते. यावेळी शाळेच्या प्राचार्य सौ.चेतना चौगुले सर्व शिक्षक व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.