देवचंद महाविद्यालयात छात्रसेना दिवस उत्साहात साजरा!
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्या जी.डी. इंगळे तसेच छात्रसेना विभाग प्रमुख मेजर डॉ.अशोक डोनर उपस्थित होते!
निपाणी नगरी प्रतिनिधी अर्जुननगर(24)
देवचंद महाविद्यालय अर्जुन नगर येथे 24 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय छात्रसेना दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्या जी.डी. इंगळे तसेच छात्रसेना विभाग प्रमुख मेजर डॉ.अशोक डोनर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे व एन.सी.सी. ध्वजाची पूजा करुन सुरुवात करण्यात आली . त्यानंतर रायफल गार्डनी ध्वजाला सलामी दिली.
प्रमुख पाहुण्यांचे हस्ते केक कट करून साजरा करण्यात आला. या वेळी द्वितीय वर्ष छात्र सैनिक कॅडेड अदिती घस्ते, कॅडेड सरिता कोळी, कॅडेड अथर्व माने, कॅडेड समृद्धी खपले, कॅडेड तनुजा पाटील, कॅडेड अनुजा पाटील व प्रथम वर्ष छात्रसैनिक कॅडेड स्वप्नील तिप्पे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मेजर डॉ.अशोक डोनर यांनी विद्यार्थ्यांना एन.सी.सी संघटन, प्रशिक्षण, शिबीरे यातूनच छात्र सैनिकांचे मानसीक, शारीरिक, बौद्धिक व सामाजिक जडणघडण होते असे स्पष्ट केले.
प्राचार्या जी.डी. इंगळे यांनी छात्रसेनेचे राष्ट्र बांधणीतील योगदानाबद्दल मार्गदर्शन केले. आजपर्यंत अनेक छात्र सैनिकांनी लष्करी सेवे बरोबरच जीवनाच्या विविध क्षेत्रात महत्वाची पदे भूषविली आहेत.अनेकविध उपक्रम राबवून संघटन कौशल्य, देशप्रेम, सामाजिक भान, शीस्तबध्दता, संघर्ष करण्याची कला, साहसी जीवन, कार्यतत्परता संवादकौशल्य इत्यादी गुणांच्या विकासाबरोबरच शैक्षणिक विकासासाठी आपल्या महाविद्यालयातील छात्रसेना कार्यरत आहे अशी प्रशंसा केली.
कार्यक्रमाला प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाचे सर्व कॅडेड उपस्थित होते. अंडर ऑफिसर सृष्टी पाटील , सी.पी.एल. तेजश्री कमते यांनी कार्यक्रम पार पडण्यास परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सि.क्यु.एम.एस.पूजा तोरसे व सी्.पी्.एल.समीक्षा भोसले यांनी केले .सृष्टी पाटील यांनी आभार प्रदर्शन केले.
कार्यक्रमाची सांगता छात्रसेना गीताने करण्यात आली . उपक्रम यशस्वी होण्यासाठी अध्यक्ष आशिष भाई शाह, उपाध्यक्षा तृप्ती भाभी शाह, खजीनदार सुबोध भाई शाह यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.