शेंडूर ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची बाजी!
मालुताई पुंडलिक नाईक यांनी 245 मते घेऊन विजयी!
![](https://nipaninagari.com/wp-content/uploads/2024/11/IMG_20241127_113130-780x470.jpg)
निपाणी नगरी प्रतिनिधी (26)
तालुक्यात लक्षवेधी ठरलेल्या शेंडूर ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत मालुताई पुंडलिक नाईक यांनी 245 मते घेऊन बाजी मारली. त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार मंगल आप्पासाहेब नाईक यांना 142 मतावर समाधान मानावे लागले. निवडणूक अधिकारी श्री कागे यांनी मतमोजणी झाल्यानंतर निकाल जाहीर करून विजयी उमेदवारांना प्रमाणपत्राचे वाटप केले.
शेंडूर गोंदूकुप्पी ग्रुप ग्रामपंचायतीचा विचार करता एकूण सदस्य संख्या 10 असून सध्याचे पक्षीय बलाबल पाहता भारतीय जनता पक्षाकडे पाच सदस्य आहेत. तीन सदस्य काँग्रेस पुरस्कृत असून आत्ताच्या मालुताई नाईक यांच्या विजयाने राष्ट्रवादी उत्तम रावसाहेब पाटील गटाकडे दोन संख्याबळ झाले आहे. त्यामुळे अध्यक्ष पद जरी भारतीय जनता पक्षाकडे असले तरी नवनिर्वाचित सदस्य मालुबाई नाईक यांच्या गळ्यात उपाध्यक्षपदाची माळ पडणार आहे.
शेंडूर ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत एका रिक्त जागेसाठी बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात आले होते त्यासाठी काहीसा मतदानाच्या निकालास वेळ लागला. निकाल जाहीर होताच विजयी उमेदवाराच्या समर्थक कार्यकर्त्यांनी गुलाबाची उधळण करून जल्लोष केला.
नूतन सदस्य मालुताई नाईक होणार उपाध्यक्ष..
एकूण दहा संख्या असलेल्या शेंदूर गोदुकुपी ग्रुप ग्रामपंचायत मध्ये भाजप, काँग्रेस, व राष्ट्रवादी काँग्रेस यांचे सध्या पाच, तीन, दोन असे अनुक्रमे संख्याबळ आहे. वार्ड नंबर एक मध्ये रिक्त झालेल्या जागेमध्ये नियुक्त असलेल्या पदसिद्ध उपाध्यक्षा शांताबाई मल्लाप्पा नाईक यांचे मागील सहा महिन्यापूर्वी निधन झाल्यामुळे ही पोट निवडणूक लागली होती. आरक्षणाच्या नियमानुसार आता हे पद उत्तम पाटील गट राष्ट्रवादी काँग्रेस गटाकडे आपोआपच आल्यामुळे जरी दोन संख्या बळ असली तरी मालुताई नाईक यांच्या गळ्यात उपाध्यक्षपदाची माळ पडणार एवढे नक्की.