व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूलचे धवल यश!
निपाणीत आयोजित केलेल्या आंतरशालेय क्रीडा प्रकारात मॉडर्नचा संघ विजेता!
निपाणी नगरी प्रतिनिधी (28)
शिक्षणाबरोबरच सांघिक खेळांना प्रोत्साहन देत विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये मोलाचे सहकार्य लाभत असल्यामुळे बेळगाव मराठा मंडळ संचलित निपाणी मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांची प्रत्येक मैदानी व बौद्धिक खेळाप्रती रुची वाढत असून हे एक चांगले लक्षण असून उत्कृष्ट शिक्षण पद्धती सह सर्व खेळ आत्मसात करणे आज काळाची गरज असल्याचे मत काल विजेत्या स्पर्धकांचा सत्कार करताना शाळेच्या प्राचार्य सौ. स्नेहा घाटगे यांनी व्यक्त केले.
त्या काल निपाणी स्पोर्ट्स क्लब आयोजित व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये धवल यश मिळवलेल्या संघातील विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात बोलत होत्या. प्रारंभी सर्व मान्यवरांच्या हस्ते विजयी संघाला सन्मानित करण्यात आले.
निपाणी स्पोर्ट्स क्लब आयोजित आंतरशालेय व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये एकूण आठ संघानी भाग घेतला होता. त्यामध्ये मॉडर्न इंग्लिश स्कूलच्या संघाने द्वितीय क्रमांकासह चषक व प्रशस्तीपत्र पटकाविले. तसेच बेस्ट स्मॅशर म्हणून कु. आदित्य खडके याची निवड करण्यात आली. मराठा मंडळ बेळगाव संस्थेच्या अध्यक्षा डॉ. राजश्री नागराजू हलगेकर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या तर शाळेच्या प्राचार्या श्रीमती स्नेहा आर. घाटगे यांचे प्रोत्साहन लाभले.
सर्व क्रीडा प्रकारांमध्ये आपल्या शाळेचे नाव उंचावण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना नेहमीच शाळेचे क्रीडा शिक्षक श्री.सुकुमार एस.गोरवाडे आणि श्री. सुधाकर डी. पवार यांचे मार्गदर्शन लाभते.