शेंडुरचा रहिवासी निपाणी मुरगुड रस्त्यावरील अपघातात जागीच ठार!
साताप्पा बाळू कांबळे असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे!
निपाणी नगरी प्रतिनिधी (29)
येथील निपाणी मुरगूड रस्त्यावर देवचंद महाविद्यालयाच्या काही अंतरावर दुचाकी अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी 26 रोजी रात्री उशिरा घडली. साताप्पा बाळू कांबळे (वय 29, शेंडूर, ता. निपाणी) असे मृत दुचाकी स्वाराचे नाव आहे. या घटनेची नोंद निपाणी शहर पोलिसांत झाली आहे.
घटनास्थळावरून व पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्री 10 च्या सुमारास साताप्पा हा दुचाकीवरून मुरगूड रस्त्यावरून निपाणीच्या दिशेने येत होता. गायकवाडीच्या पुढे आल्यावर त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने तो कोसळला. दरम्यान, साताप्पा याला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी त्याला महात्मा गांधी रुग्णालयात हलविले. पण, उपचारापूर्वीच साताप्पा याचा मृत्यू झाला. याप्रकरणी वडील बाळू कांबळे यांनी फिर्याद दिली आहे.