अरे बापरे! बस उलटून अकरा जणांचा मृत्यू!
समोरील वाहनास ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात झाला अपघात झाल्याचा अंदाज!
निपाणी नगरी प्रतिनिधी (30)
समोरील गाडीला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असलेल्या भरधाव शिवशाही बस ड्रायव्हरचे नियंत्रण सुटल्यामुळे झालेल्या अपघातात 11 जण ठार झाले असून दहापेक्षा अधिक जन जखमी आहेत..
भरधाव शिवशाही बस र उलटून शुक्रवारी झालेल्या भीषण अपघातात तब्बल 11 जणांचा मृत्यू झाला तर दहापेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. या घटने प्रकरणी महाराष्ट्राची काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांनी शोक व्यक्त केला असून राज्य सरकारकडून घटनेतील मृतांच्या वारसांना दहा लाख रुपयाची मदत जाहीर करण्यात आली असून. केंद्र सरकारकडून देखील मदतीची घोषणा करण्यात आली आहे.
भंडारा आगाराची बस क्रमांक एम एच 09 इएम 12 73 ही प्रवाशांना घेऊन भंडाऱ्यावरून गोंदियाकडे जात होती याच दरम्यान सडक अर्जुनी तालुक्यातील डव्हा खजरी गावाजवळील वृंदावन फाट्यावर ही शिवशाही बस उलटली. एका समोरील वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ही बस उलटल्याचे प्रथम दर्शनी सांगितले जाते एस टी महामंडळाकडून अज्ञात दुचाकी स्वार आडवाल्याने त्याला वाचवण्याचा प्रयत्न ही बस उलटल्याचा दावा केला आहे. घटनेचा पुढील तपास संबंधित खात्यातर्फे करण्यात येत आहे. या घटने संदर्भात भाजपचे वरिष्ठ नेते व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील शोक व्यक्त केला असून केंद्राकडून योग्य ती मदत देण्याचे सुतवाच केले आहे.