आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक
कन्याशाळेतील विद्यार्थिनींचे खुल्या व्हॉलीबॉल स्पर्धेत यश!
निपाणी नगरी प्रतिनिधी (30)
येथील दि फिमेल एज्युकेशन सोसायटी संचालित सौ. भागिरथीबाई शाह कन्याशाळेतील विद्यार्थिनींनी खुल्या आंतरशालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळविले.
निपाणी येथील स्पोर्टस क्लबच्या तीने आंतरशालेय व्हॉलीबॉल खुल्या स्पर्धा झाल्या. स्पर्धेत माध्यमिक विभागाच्या संघाने प्रथम व प्राथमिक शाळेच्या संघाने व्दितीय क्रमांक मिळविला. श्रेया डाफळे हिला बेस्ट ऑल राऊंडर, तर कल्याणी पाटील हिला बेस्ट सेंटर पुरस्कार मिळाला. अनुष्का राऊत, वल्लरी कुलकर्णी यांच्यासह दोन्ही संघांतील खेळाडूंना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
सर्व खेळाडूंचे संस्थेचे अध्यक्ष आशिष शाह, प्रभारी मुख्याध्यापिका डॉ. एस. जे. पाटील, क्रीडा शिक्षिका ए. डी. पाटील व संचालकांनी अभिनंदन केले.