आपला जिल्हाक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरशैक्षणिक
झोनल कुस्ती स्पर्धेत देवचंद कॉलेजच्या सातप्पा हिरुगडेला सुवर्णपदक!
निपाणी नगरी प्रतिनिधी (29)
व्यांकोबा मैदान येथे नुकत्याच कोल्हापूर झोनल कुस्ती स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या.या स्पर्धेत 70 किलो वजनीगटात देवचंदच्या साताप्पा हिरुगडे याने फ्री स्टाईल प्रकारात सुवर्ण पदक जिंकून आंतरविभगिय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली.स्पर्धेचे संयोजन जयवंत महविद्यालय इचलकरंजी यांचे तर्फे करण्यात आले होते.
विजयी खेळाडूना जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा.आशिषभाई शाह, उपाध्यक्ष डॉ. सौ. तृप्तीभाभी शाह, संस्थेचे खजिनदार मा. सुबोधभाई शाह. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.सौ. जी. डी. इंगळे , उपप्राचार्य डॉ. पी.पी. शाह यांचे मोलाचे प्रोत्साहन लाभले. जिमखाना विभाग प्रमुख डॉ. रवींद्र चव्हाण, प्रा. निरंजन जाधव व जिमखाना कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले.