दक्षिण पश्चिम आंतरविद्यापीठ वेटलिफ्टिंग स्पर्धेत देवचंद कॉलेजच्या भुमिका मोहितेची रौप्यपदकाची कमाई!
![](https://nipaninagari.com/wp-content/uploads/2024/12/IMG_20241201_203903-615x470.jpg)
निपाणी नगरी प्रतिनिधी (2)
दक्षिण पश्चिम आंतर विद्यापीठ वेटलिफ्टीग स्पर्धा नुकत्याच आचार्य नागार्जुन विद्यापीठ गुंटूर आंध्रप्रदेश या ठिकाणी संपन्न झाल्या. या स्पर्धेत देवचंद कॉलेजच्या भुमिका मोहितेने रौप्य पदकांची कमाई केली. 64 किलो वजनी गटात भुमिकाने 182 किलो इतके वजन उचलुन रौप्यपदक जिंकले. स्पर्धेमध्ये 125 विद्यापीठातील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. सेंट्रल विद्यपीठ हिमाचल प्रदेश येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेकरिता तिची निवड शिवाजी विद्यापीठ संघात झाली आहे.
विजयी खेळाडूना जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा.आशिषभाई शाह, उपाध्यक्ष डॉ. सौ. तृप्तीभाभी शाह, संस्थेचे खजिनदार मा. सुबोधभाई शाह. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.सौ. जी. डी. इंगळे, उपप्राचार्य डॉ. पी.पी. शाह यांचे मोलाचे प्रोत्साहन लाभले. जिमखाना विभागप्रमुख डॉ. रवींद्र चव्हाण, आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टींग प्रशिक्षक श्री.प्रदीप पाटील प्रा. निरंजन जाधव जिमखाना कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले.