अंकुरमच्या विद्यार्थ्यांचे कोल्हापूर येथे इन्ड्युरन्स स्केटिंग स्पर्धेत यश!
स्पर्धेत सहभाग घेतलेल्या 15 विद्यार्थ्यांपैकी दहा विद्यार्थ्यांना घवघवीत यश!
निपाणी नगरी प्रतिनिधी (2)
एक डिसेंबर 2024 रोजी सचिन टीम टॉपर्स अकॅडमी तर्फे आयोजित इंडुरन्स स्केटिंग स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. जिल्हा पातळीवर या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते अंकुरम इग्लिश मीडियम स्कूल कोडणी निपाणी शाळेतून विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेऊन घवघवीत यश प्राप्त केले.
शाळेची विद्यार्थिनी कुमारी अनन्या तांबेकर व विराज पाटील यांनी या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून सुवर्णपदकाची कमाई केली तर प्रियंका कट्टी आर्या चावरेकर शोम पावले व सुफियान इनामदार यांनी द्वितीय क्रमांक पटकावत रौप्य पदकांची कमाई केली. कु. प्रणव खोत, निया शाह, आयुष पवार व कृष्णराज सडोळकर यांनी यांनी तृतीय क्रमांक पटकावत कांस्य पदकांची कमाई केली.
स्पर्धकांचे व विजेत्यांची शाळे कडून कौतुक करण्यात आले असून सर्व स्पर्धकांना शाळेचे स्केटिंग शिक्षक श्री इंद्रजीत मराठे यांचे मार्गदर्शन लाभले. या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील विविध स्तरातील व विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. अंकुरम इंग्लिश मीडियम स्कूलच्या 15 विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता. यातील दहा विद्यार्थ्यांनी विविध क्रमांक पटकावून इतर विद्यार्थ्यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवले.
शाळेच्या प्राचार्या सौ चेतना चौगुले व सेक्रेटरी डॉ. अमर चौगुले यांनी विद्यार्थ्यांना विशेष प्रोत्साहन दिले. तसेच विजेत्यांचे व स्पर्धकांचे विशेष कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.