देवचंदच्या वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांची सदा साखर,कागल येथे अभ्यास भेट संपन्न!
निपाणी नगरी प्रतिनिधी (7)
दिनांक 2 जानेवारी 2025 रोजी देवचंद कॉलेजमध्ये अकरावी वाणिज्य शाखेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी सदाशिवराव मंडलिक कागल तालुका सहकारी साखर कारखाना येथे अभ्यास भेठ संपन्न झाली. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी साखर उद्योगा विषयी संपूर्ण माहिती घेतली तसेच ऊस कापून आणण्यापासून ते साखर तयार होईपर्यंत कोणत्या कोणत्या प्रकारच्या प्रक्रिया त्याच्यावर केल्या जातात त्याविषयी माहिती घेतली, तसेच कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या वेगळ्या प्रकारच्या सोयी सुविधा शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधा याविषयी माहिती कारखान्याचे लेखापाल सुजल पाटील यांनी दिली. कारखान्याचे कार्यकारी संचालक, सेक्रेटरी, यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. या भेटीदरम्यान किमान कौशल्य विभाग प्रमुख श्री महेश दिवटे वाणिज्य शाखेतील श्री नितीन कोले ,तसेच मराठी विभागाच्या प्रा. कृष्णामाई कुंभार हे उपस्थित होते. या कारखाना भेटीसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य ज्युनियर महाविद्यालयाचे उप, प्राचार्य, पर्यवेक्षक या सर्वांचे सहकार्य लाभले.