देवचंद कॉलेज अर्जुननगर मध्ये मराठी, हिंदी व इंग्रजी विभाग आयोजित “वाचन संकल्प महाराष्ट्राचा”
निपाणी नगरी प्रतिनिधी (7)
देवचंद कॉलेज अर्जुननगर मध्ये मराठी, हिंदी व इंग्रजी विभाग (महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग) आयोजित ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमा अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांचे उद्घाटन देवचंद कॉलेज अर्जुननगरच्या प्राचार्य डॉ. जी. डी. इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी अभिवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी मा. प्राचार्य डॉ. जी. डी. इंगळे यांनी वाचनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. तसेच मोबाईलमध्ये आपला अधिक वेळ घालविण्यापेक्षा विद्यार्थ्यांनी वाचनाचा आनंद घ्यावा आणि त्यातून आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करावा असे मार्गदर्शन केले. स्वागत व प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख साळुंखे यांनी केले. त्यावेळी त्यांनी वाचनाचे महत्त्व आणि अभिवाचन कसे करावे याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या अभिवाचन स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला. अतिशय उत्तम रीतीने विद्यार्थ्यांनी अभिवाचन करून हा कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आशालता खोत यांनी केले तर आभार डॉ. प्रवीणसिंह शिलेदार यांनी केले. या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षकांनी सहकार्य केले. हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आशिषभाई शाह यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमात अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.