आपला जिल्हाकृषीक्राईमक्रीडागुन्हाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिकसंपादकीय

निपाणीतील सामाजिक कार्यकर्ते नवनाथ चव्हाण यांच्या घरावर लोकायुक्तांचा छापा! परिसरात खळबळ

बंद दाराआड अधिकाऱ्यांचे माहिती घेण्याचे काम चालू! घरामध्ये जाण्यास सर्वांना मज्जाव!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (8)

निपाणीतील  सामाजिक कार्यकर्ते श्री नवनाथ चव्हाण यांच्या घरावर बेळगांव लोकायुक्तांचा छापा. परिसरात खळबळ अनेक किचकट विषय समोर येण्याची शक्यता घटनास्थळावरून मिळत आहे.

समजलेल्या माहितीनुसार निपाणीत आदर्श नगर येथे नवनाथ चव्हाण यांच्या फार्म हाऊस वर (राहत्या घरी) लोकआयुक्तांचा छापा पडला असून याची चर्चा सर्व निपाणीकर करत आहेत.

बेळगाव जिल्ह्यातील निपाणी शहराच्या हद्दीतील आदर्श नगर प्रभाग क्रमांक 29 येथील नवनाथ चव्हाण यांच्या फार्म हाऊसवर लोकायुक्त अधिकाऱ्यांनी आज सकाळी छापा टाकला असून लोकायुक्त अधिकारी अधिक तपास करत आहेत, या पडलेल्या छाप्या मुळे निपाणीतील अनेक लोकांचे धाबे दणाणले असून आठ ते दहा अधिकारी मिळून त्यांच्या घरी माहिती घेत आहेत. व या घटनेमुळे स्थानिक लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सर्वत्र खळबळ उडाली आहे.


छाप्याचे मुख्य कारण निपाणीतील सेवा करून गेलेले तहसीलदार…

या छाप्या संदर्भात अधिक माहिती मिळवताना असे लक्षात आले की श्री नवनाथ चव्हाण यांच्या घरी पडलेली धाड ही काही एका ठिकाणी पडलेली धाड नसून अकोळ, निपाणी, बेळगाव, खानापूर यासारख्या पाच ते सात ठिकाणी एकत्रित धाडी पडल्या असून याचे मुख्य कारण निपाणीतील आपली सेवा बजावून गेलेले तहसीलदार असल्याचे खात्रीलायक सूत्राच्या कडून समजते. 


बेहिशेबी व अनधिकृत जागा व जमिनी बळकावणाऱ्यांचे धाबे दणाणले…

या छाप्याचे मुख्य कारण अजून पर्यंत समजले नसले तरी निपाणीतील सरकारी अधिकाऱ्यांशी संगनमत करून निपाणी व परिसरातील रिकाम्या जागा, बांधलेले फ्लॅट्स, किंवा शेतजमीन बळकावून घेऊन आपले साम्राज्य निर्माण करत गोरगरिबांची गळचेपी करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांचे व त्यांच्या नेत्यांचे, युवा नेत्यांचे धाबे मात्र दणाणले आहे. कारण निपाणी परिसरातील आजची धाड म्हणजे फक्त हिमनगाचे टोक आहे. अशी दबक्या आवाजात चर्चा परिसरात होत आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!