मा.अनसूयाबेन देवचंदजी शाह अंतरराज्यीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात!
निपाणी नगरी प्रतिनिधी अर्जुननगर, मंगळवार:7 जानेवारी 2025:
देवचंद महाविद्यालय अर्जुननगर येथे मा. अनसूयाबेन देवचंदजी शाह ट्रस्ट मार्फत आयोजित वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धा पूर्वतयारी व उत्स्फूर्त अशा दोन प्रकारांमध्ये आयोजित केल्या होत्या .त्याचा निकाल पुढीलप्रमाणे
पूर्वतयारी
प्रथम -ऋतुजा पोवार
द्वितीय -अमृता सागर
तृतीय -साईराज घाटपांडे
उत्स्फूर्त
प्रथम- चारुदत्त माळी
द्वितीय -प्रगती गुरव
तृतीय- अजय सकटे
तर 03 जानेवारी रोजी झालेल्या स्वर्गीय पद्मभूषण देवचंदजी शाह महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे:
पूर्वतयारी:
प्रथम:सहयाद्री कमळकर
द्वितीय:तानिया किल्लेदार
तृतीय-निकिता भोसले
उस्फूर्त
प्रथम : तानिया किल्लेदार
द्वितीय :निकिता भोसले
तृतीय : सहयाद्री कमळकर
सर्व यशस्वी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र ,रोख रक्कम व ट्रॉफी देण्यात आली तर सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आले . या स्पर्धेसाठी विविध विभागातून स्पर्धक उपस्थित होते . ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष आशिषभाई शाह, उपाध्यक्षा डॉ प्रतिभाभाभी शाह, उपाध्यक्षा डॉ. सौ. तृप्तीभाभी शाह तसेच खजिनदार सुबोधभाई शाह यांचे मार्गदर्शन मिळाले.
वकृत्व स्पर्धेची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते मा.अनसूयाबेन देवचंदजी शाह यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रो. डॉ जी डी इंगळे अध्यक्षीय भाषणात म्हणाल्या की विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व विकसित होण्यासाठी वक्तृत्व हा गुण असला पाहिजे. समाजात घडत असलेल्या घटनांची संवेदनशील मनाने माहिती घेऊन त्याच्यावर स्वतःचे मत व्यक्त करणे हे तरुण पिढीसाठी अत्यावश्यक असून या वक्तृत्व कलेद्वारे अशा विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते. सर्व स्पर्धकांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेसाठी प्रा.एन बी एकिले , प्रा.नर्मदा कुराडे व प्रा चेतन चौगुले यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ.प्रविणसिंह शिलेदार यांनी केले तर स्पर्धा नियम व अटी यांचे वाचन प्रा. विष्णू पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभार प्रा. सदानंद झळके यांनी केले. या स्पर्धेसाठी डॉ आशालता खोत, प्रा.असमा बेग, प्रा.विनायक कुंभार तसेच संदीप भगते, वैभव सोनार आणि शिवदास चव्हाण या सर्वांचे विशेष सहकार्य लाभले.