34 कोटींचे ऊस बिल हालसिद्धनाथ कडून जमा- अध्यक्ष एम.पी.पाटील
शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम केली वर्ग!
निपाणी नगरी प्रतिनिधी (8)
येथील हालसिध्दनाथ सहकारी साखर कारखान्यात १६ ते ३१ डिसेंबर या काळात १ लाख ११ हजार ७०० मेट्रीक टन उसाचे गाळप झाले आहे. त्यापोटी ३३ कोटी ८४ लाख रुपये ऊस बिलाची रक्कम संबंधित ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष एम. पी. पाटील यांनी बुधवारी एका पत्रकाद्वारे दिली.
याबद्दल प्रसिध्दी पत्रकातील माहिती कारखान्याचे अशी, मार्गदर्शक व माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले, निपाणीच्या आमदार शशिकला जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचा २०२४-२५ सालातील ऊस गाळप हंगाम क्षमतेने सुरू आहे. ०८ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या गाळप हंगामात गाळप होणाऱ्या प्रतिटन उसाला ३ हजार ३० रुपये दर जाहीर केला आहे. ८ ते १५ डिसेंबरपर्यंत गाळप झालेल्या २ लाख ९० हजार ८४१ मेट्रिक टन ऊस गाळपापोटी यापूर्वी ८८ कोटी १२ लाखांची रक्कम या आधीच ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे. यापुढे गाळप होणाऱ्या ऊस बिलाची रक्कम वेळेवर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल. शेतकऱ्यांनी जास्तीतजास्त ऊस पाठवून सहकार्य करावे.