सौ.भा.शाह कन्याशाळेत विविध गुणदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न!
उद्घाटन संस्थेचे व्हाईस चेअरमन श्रीमान प्रसन्नकुमार गुजर यांच्या हस्ते झाले!
![](https://nipaninagari.com/wp-content/uploads/2025/01/IMG_20250109_170105-780x470.jpg)
निपाणी नगरी प्रतिनिधी (8)
दि फिमेल एज्युकेशन सोसायटी संचलित सौ भागिरथी बाई शाह कन्याशाळा व गर्ल्स मराठी कॉन्व्हेंट स्कूल निपाणी या शाळांचा वार्षिक स्नेहसंमेलना निमित्य विविध गुणदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे व्हाईस चेअरमन श्रीमान प्रसन्नकुमार गुजर यांच्या हस्ते झाले. यावेळी संस्थेचे खजिनदार श्रीमान अनिलकुमार मेहता संचालिका डॉ. प्रविणा शाह संचालक श्रीमान प्रसन्न दोशी शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका डॉ.सौ.एस.जे. पाटील श्री आर. पी-बामणे आदी मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थीनीच्या सुप्त गुणांचा विकास व्हावा या उद्देशाने विविध प्रकारचे सांस्कृतिक, कार्यक्रम सादर करण्यात आले. शेतकरी नृत्य, कोळी नृत्य टिपरी मंगळागौर, गोंधळ गीत, लावणी, कन्नड नृत्य, देशभक्ती गीत एकपात्री अभिनय एक तबला पेटीवादन आदी कार्यक्रम सादर करण्यात आले.
विविध हिंदू सणांचा परिचय देशभक्ती गीत व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यावरील नाटक विशेष लक्षवेधी ठरले. मनोरंजना बरोबर समाज प्रबोधन करणारे बहारदार कार्यक्रम विद्यार्थीनींनी सादर केले सर्वच कार्यक्रमांना पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यु.बी. नागावे ए. आर. पाटील, व्ही. ए. निगवे, एस. एस. घाटगे, आर. व्ही. मधाळे, आर. व्ही. घाटगे, के एन मंगसुळी जे. एम. शिंत्रे, जे. सी. चंद्रकुडे, जे. ए. कुरबेट्टी, के. एस. भादुले, एस.डी. काळे, पी. एम. कवाळे ए.जी. पाटील, एस.आर.ईराज, एम. एम. चिकोडे आदींनी परिश्रम घेतले.