सौ.भा.शाह कन्याशाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात!
कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या डॉ. जी. डी. इंगळे प्राचार्या देवचंद, कॉलेज अर्जुननगर या होत्या!
निपाणी नगरी प्रतिनिधी (8)
दि फिमेल एज्युकेशन सोसायटी संचलित सौ. भागिरथीबाई शाह कन्याशाळा व गर्ल्स मराठी कॉन्हेंट स्कूल निपाणी या शाळेंचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या डॉ. जी. डी. इंगळे प्राचार्या देवचंद, कॉलेज अर्जुननगर या होत्या. कार्यक्रमास संस्थेचे खजिनदार अनिल कुमार मेहता, संचालिका डॉ. प्रविणा शाह, संचालक प्रसन्न दोशी, माजी मुख्याध्यापक आर. बी रामनकट्टी शाळेची पंतप्रधान कु श्रेयशी राजगीरे व दिव्या मुरगुडे आदी उपस्थित होते.
शाळेच्या, विद्यार्थीनींनी स्वागत गीतातून उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका डॉ. सौ. एस.जे. पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक भाषण केले. पी. आर. पाटील यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली. विद्यार्थीनीच्या लेखणीतून साकारलेल्या सुकन्या या हस्त लिखीताचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झाले. सौ. ए. आर. पाटील यानी अहवाल वाचन केले.
यावेळी बोलताना डॉ. जी.डी. इंगळे म्हणाल्या “सध्याचे युग हे स्पर्धेचे आहे. आपले ध्येय निश्चित करून कठोर परिश्रम करणे आवश्यक आहे. प्रत्येकाच्या अंगी विशेष गुण, क्षमता असतात त्या ओळखून त्यांचा विकास करून घेतला पाहिजे. त्यासाठी शाळेत राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमात भाग घ्यावा व आपला सर्वांगीण विकास साधावा. आत्मविश्वास, प्रखर इच्छाशक्ती व प्रयत्नातील सातत्य याच्या जोरावर आपण जीवनात यश संपादन करू शकतो. पालकांनी मुलांना टी.व्ही व मोबाईल पासून दुर ठेवावे. मुलींनी आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे पौष्टिक व संतुलित आहार सेवन करावा.
स्नेहसंमेलना निमित्त्य आयोजित विज्ञान प्रदर्शनामध्ये प्रदूषण नियंत्रण, सोलार ट्रेकर, त्रिमितीय आकृत्या, वॉटर क्लिनिंग मशीन, रेन वॉटर डिटेक्टर, ए आय बेस्ड ॲर्गिकल्चर, सोलार सिस्टिम, शेती, चाद्रयान ३ पवन उर्जा, होम सिक्युरीटी अलार्म आदी 40 उपकरणे मांडली होती. हस्तकले मध्ये विणकाम, शिवणकाम, भरतकाम या प्रकारातील तयार केलेल्या वस्तू मांडल्या होत्या. कार्टून व साडीवरील डिझाईन यावरील सुंदर रांगोळीचे रेखाटन केले होते. पाककलेतही विविध पदार्थाची मांडणी केली होती. वार्षिक क्रिडा, विविध प्रदर्शन तसेच जिल्हा व. राज्यस्तरावर प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थीनींचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र, स्मृती चिन्ह, रोख रक्कम देवून गौरविण्यात आले.
विविध गटांत आदर्श आदर्श विद्यार्थीनी आराध्या शिंदे (बालवाडी लहान गर) अनघा पाटील (बालवाडी मोठा गट), दिव्या मुरगुडे (5 वी), भूमी यादव (7 वी) व अनुष्का राऊत (10वी) यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
कार्यक्रमास यु.बी. नागावे एम.एम. चिकोडे, एस. आर. इराज ए.डी. पाटील एस. एस. घाटगे, आर. व्ही. घाटगे, आर. व्ही, मधाळे, के.एन. मंगसुळे, जे. एम. शिंत्रे, जे. सी. चंद्रकुडे, जे. ए. कुरबेट्टी, के. एस भादुले, एस. डी. काळे, पी. एम. कवाळे ओ. एम. कुलकर्णी शशिकांत हवालदार, सुभाष माळी आदीनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले श्री आर. पी. बामणे यानी आभार मानले व श्री सी. एम. बाडकर यांनी सुत्रसंचालन केले.