कवी उमेश शिरगुप्पे यांना आंतरराष्ट्रीय फुले समाजरत्न पुरस्कार प्रदान!
एस. एम. जोशी फाउंडेशनच्या सभागृहात या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते!
निपाणी नगरी पणजी (प्रतिनिधी) 08
कवी उमेश शिरगुप्पे यांना आंतरराष्ट्रीय फुले प्रेमी समाजरत्न पुरस्काराने कवी तथा भिडेवाडाकार विजय वडवेराव यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. पुणे येथे देशातील मुलींची पहिली शाळा असलेल्या भिडेवाडा येथे आंतरराष्ट्रीय काव्य जागर अभियानांतर्गत पहिल्या आंतरराष्ट्रीय फुले महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. दि. २ ते ५ जानेवारी दरम्यान येथील एस. एम. जोशी फाउंडेशनच्या सभागृहात या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पणजी येथील कवी उमेश शिरगुप्पे यांनी सावित्रीमाई तुझ्यामुळेच या कवितेचे सादरीकरण केले होते. त्यांच्या च्या या सादरीकरणाला उपस्थित मान्यवरांकडून विशेष कौतुक प्राप्त झाले. या महोत्सवात वडवेराव यांच्या मातोश्री सुलाबाई यांच्या सह २५ जणांना समाजरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी विविध राज्यांतील कवी कवयित्री, कलाकार, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.