श्री महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द सहकारी नियमित निपाणी, शाखा हुन्नूरगी 23 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा!
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चेअरमन श्रीकांत परमणे हे होते!
निपाणी नगरी प्रतिनिधी (11)
कर्नाटक राज्यातील सहकार क्षेत्रातील नामवंत व बेळगाव जिल्ह्यातील अग्रेसर व अग्रगण्य श्री महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द सहकारी नियमित निपाणी या संस्थेच्या हुन्नूस्गी शाखेचा 23 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी संस्थेचे चेअरमन श्रीकांत परमणे यांच्या हस्ते श्री महात्मा बसवेश्वर फोटो पूजन व संस्थापक चेअरमन डॉक्टर सी. बी कुरबेट्टी यांच्या हस्ते सिद्धेश्वर स्वामी यांच्या फोटोचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. व कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते व शाखा चेअरमन व्हाईस चेअरमन व संचालक मंडळ यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चेअरमन श्रीकांत परमणे हे होते. डॉक्टर सी. बी. कुरबेट्टी यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले की हुन्नूरगी शाखेत 10 कोटी ठेवी व ९ कोटी कर्ज वितरण केल्याचे सांगितले व नफा 16 लाख 19 हजार झाल्याचे सांगितले. तर चेअरमन श्रीकांत परमणे यांनी सांगितले की शाखेची शंभर टक्के कर्ज वसुली झाल्याचे सांगितले. त्यामुळे हुन्नूरगी शाखा नावारूपास आली आहे.
कार्यक्रमास मुख्य शाखा व्हा. चेअरमन श्री प्रताप पट्टणशेट्टी, संचालक श्री महेश व्ही. बागेवाडी, डॉ. एस आर पाटील, श्री सुरेश शेट्टी, श्री किशोर बाली. श्री अशोक लिगाडे, श्री सदानंद दुमाले, श्री प्रताप मेत्राणी, श्री दिनेश पाटील, श्री सदाशिव धनगर, संचालिका सौ पुष्पा कुरबेट्टी, सौ सुवर्णा पट्टणशेट्टी, श्रीमती विजया शेट्टी. शाखा चेअरमन श्री रामगोंडा पाटील व्हाईस चेअरमन श्री पायमोंडा पाटील तसेच संचालक सुदीप मुरदुंडे, वसंत शिंत्रे, अशोक मुरदुंडे, देवाप्पा कांबळे, सौभाग्यवती शर्मिला मुरदुंडे, तसेच संस्थेचे सभासद हितचिंतक ग्राहक ठेवीदार कर्जदार तसेच ग्रामस्थ व नागरिक व हेड ऑफिसचे सी.ई.ओ एस. के. आदन्नावर तसेच कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन असिस्टंट सी. ई.ओ. श्री सुरेश आवटे यांनी केले तर उपस्थितांचे आभार शाखा व्यवस्थापक राजेंद्र मगदूम यांनी मानले.