श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट तहशिलदार प्लॉट येथे गणेश जयंती सोहळा होणार उत्साहात!
महाप्रसादाकरिता भाविकांनी शिधा व देणगी स्वरूपात मदत करण्याचे आवाहन!

निपाणी नगरी प्रतिनिधी (31)
श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट श्री सिद्धिविनायक तरुण मंडळ तहसीलदार प्लॉट शिरगुपी रोड निपाणी येथे गणेश जयंती सोहळा समारंभ मोठ्या उत्साहात होणार साजरा.
शनिवारी दिनांक 1 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 7:15 दरम्यान श्रींच्या मूर्तीस अभिषेक व आरती होणार असून सकाळी 8 ते 11 पर्यंत “श्री गणेश याग यज्ञ होम” पौराहितांच्या उपस्थितीमध्ये केला जाणार असून यावर्षी पूजेचा मान सामाजिक कार्यकर्ते श्री. प्रदीप बाळमारे व कुटुंबीयांना मिळाला आहे. सकाळी 11:15 वाजता श्रींचा जन्मकाळ व त्यानंतर दुपारी साडेबारा वाजता महाप्रसाद व सायंकाळी 6 वाजता श्रींच्या पालखीची नगरप्रदक्षिणा होणार असून श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट विश्वस्थ, अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकारी सभासद तहशिलदार प्लॉट निपाणी यांच्या वतीने सर्व कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे.
श्रींच्या महाप्रसादाकरिता भाविकांनी गहू, तांदूळ, गूळ, तेल या प्रकारचा शिधा व रोख देणगी देऊन पुण्य संपादन करण्याचे आवाहन करण्यात येत असून अन्नदान हे श्रेष्ठ दान असून भाविकांच्या व श्री सिद्धिविनायक ट्रस्टच्या वतीने मंदिरामध्ये गेल्या दहा वर्षापासून प्रत्येक महिन्याच्या संकष्ट चतुर्थीला चंद्रोदया नंतर अन्नदान सेवा चालू आहे या सेवेमध्येही भाविकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत असून गणेश जयंती सोहळ्यास महाप्रसादाकरिता ज्या लोकांना शिधा व रोख देणगी देण्याची आहे. त्यांनी निपाणी बेळगाव नाका येथील रेणुका टी स्टॉल, मुरगुड रोड येथील श्री बेकर्स व मुन्सिपल हायस्कूल शेजारी असणाऱ्या रेणुका टी स्टॉल येथे देण्याचे आवाहन करण्यात येत असून सर्व लोकांनी अन्नदान श्रेष्ठदान मानून सढळ हस्ते मदत करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.