कर्तव्यदक्ष संस्थेकडून, कर्तुत्ववान व्यक्तीला पुरस्कार- परमात्मराज राजीवजी महाराज
मराठा मंडळ संस्थेत सत्कार, पारितोषिक वितरण समारंभ संपन्न!

निपाणी नगरी प्रतिनिधी (31)
समाजासाठी आपली काही देणे लागतो या उदात भावनेने कार्य करत असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा समाजातील प्रत्येक घटकांनी सर्व समावेशक व उदात्त हेतू ठेवून विचार केल्यास त्या व्यक्तीला कार्य प्रेरित केले जाते. प्रत्येक व्यक्तीच्या कामावरून त्याची गुणवत्ता ठरली जाते. चांगले काम करण्या बरोबरच व्यक्तीमधील चांगले गुण अखेरपर्यंत राहिले पाहिजेत. पुरस्कार माणसाला पुढे नेण्याचे काम करतात. पुरस्कारामुळे जबाबदारी मध्येही वाढ होते, असे मत आडी येथील दत्त देवस्थान मठाचे मठाधिपती परमात्माराज राजीवजी महाराज यांनी व्यक्त केले.
येथील मराठा मंडळ संस्थेच्या शिक्षण समितीचे अध्यक्ष राजेश कदम यांना सतीश जारकीहोळी फाउंडेशन तर्फे शिक्षणरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार आणि विविध स्पर्धांमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण समारंभ गुरुवारी (ता.30) पार पडला. त्याप्रसंगी ते बोलत होते.
सत्काराला उत्तर देताना “शिक्षण रत्न” राजेश कदम म्हणाले या मिळालेल्या पुरस्काराबद्दल मी सतीश जारकीहोळी फाउंडेशनचा आभारी असुन या पुरस्काराने मला माझ्या भागातील विद्यार्थ्यांच्या प्रती व सर्व सामान्य नागरिकांच्या साठी अधिक काम करण्याचे बळ मिळाले असून मी त्याचा योग्य तो वापर करून या पुरस्काराच्या ऋणात राहणं पसंत करीन असे म्हणाले. यावेळी माजी मंत्री वीरकुमार पाटील, बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, राजेश कदम यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास माजी आमदार प्रा. सुभाष जोशी, संस्थेचे अध्यक्ष रवींद्र कदम, चिक्कोडी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष रोहन साळवे, संगीता कदम, ज्योती कदम, बेडकीहाळ भाग काँग्रेस अध्यक्ष बसवराज पाटील, माजी नगराध्यक्ष चंद्रकांत जासूद, बी. जी. पाटील, पी. एम. सुतार, माजी नगराध्यक्ष विजय शेटके, गजेंद्र पोळ, राजेंद्र चव्हाण, किरण कोकरे, बबन चौगुले, संदीप चावरेकर, डॉ. विनय निर्मळे, प्राचार्य एस. आर. कुलकर्णी, मुख्याध्यापक डी. डी. हळवणकर, बी. आर. मोहिते, के.एस. कांबळे, मराठा मंडळ व्यवस्थापक अशोक संकाजे, यांच्यासह विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ए. एम. यादव यांनी प्रास्ताविक स्वागत व सूत्रसंचालन केले.