अथणी शुगर्स लि. तांबाळे युनिट तर्फे रक्तदान शिबिर उत्साहात!
माजी मंत्री श्रीमंत पाटील (तात्या) यांच्या वाढदिवसाचे औचित्य! रक्तदान शिबिराचे उद्घाटन चीफ इंजिनियर नामदेव भोसले यांच्या अमृतहस्ते!

निपाणी नगरी प्रतिनिधी ( 31)
अथणी शुगर्स लि. भुदरगड युनिट येथे रक्तदान शिबिर उत्साहात करण्यात आले. कर्नाटक राज्याचे माजी मंत्री श्रीमंत पाटील (तात्या) यांच्या वाढदिवसानिमित्त (31 जानेवारी ) रक्तदान शिबिर आयोजित केले होते. रक्तदान शिबिरासाठी अर्पण ब्लड बँक कोल्हापूर यांच्या सहकार्याने वाहतूक कंत्राटदार. ड्रायव्हर अधिकारी, कर्मचारी, सभासद, हितचिंतक, या सर्वांनी रक्तदान शिबिरात मोठ्या प्रमाणात रक्तदान केले. दिवसभरामध्ये वाढदिवसाचे औचित साधून एकूण 103 रक्तदात्यांनी रक्तदान केले. सर्व रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना गौरव समितीतर्फे जेवणाची सोय केली होती तसेच त्यांना भेटवस्तू देखील देण्यात आली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यालय अधीक्षक बाबासाहेब देसाई यांनी विशेष परिश्रम घेतले.
रक्तदान शिबिराचे उद्घाटन मा. नामदेव भोसले चीप इंजिनियर यांच्या अमृत हस्ते करण्यात आले. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना श्री भोसले म्हणाले रक्तदान श्रेष्ठदान मानले जाते कारण यामुळे एखाद्या गरजू रुग्णाचे प्राण वाचू शकतात. नियमित रक्तदान केल्याने शरीरात नव्या रक्त पेशींची निर्मिती होते व आरोग्य सुधारते. रक्तदानामुळे हृदयविकार, उच्च रक्तदाब आणि लोहाची जादा मात्रा टाळण्यास मदत होते. प्रत्येक आरोग्यसंपन्न व्यक्तीने दर तीन महिन्यांनी रक्तदान करावे. रक्तदान प्रक्रियेस अवघ्या 10 ते15 मिनिटे लागतात आणि त्यामुळे कोणतेही मोठे दुष्परिणाम होत नाहीत. “रक्तदान – जीवनदान” या संदेशाचा प्रसार करून अधिकाधिक लोकांना प्रेरित करावे असे वाढदिवसाचे औचित्य साधत आवाहन केले.
रक्तदान शिबिरास चीफ केमिस्ट प्रकाश हेदुरे , शेती अधिकारी राजाराम आमते,चीप अंकौटंट, जमीर मकानदार, सर्व विभागाचे प्रमुख, कर्मचारी, वाहतूक कंत्राटदार, ड्रायव्हर, सभासद व महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.