आज ह. भ. प. भागवत संत महाराज नणदी यांची कीर्तन सेवा!
तहसीलदार प्लॉट येथील सिद्धिविनायक ट्रस्ट तर्फे आयोजन!

निपाणी नगरी प्रतिनिधी (2)
काल एक फेब्रुवारी रोजी झालेल्या गणेश जयंती निमित्त सर्वत्र उत्सवाचे वातावरण पाहावयास मिळत आहे. गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या कार्यक्रमा सारखाच सर्वत्र गणेश जयंतीचा कार्यक्रम देखील होत असल्यामुळे भाविकांच्या उत्साहाला उधाण आले आहे.
सालाबाद प्रमाणे सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट तहशिलदार प्लॉट येथे गणेश जयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी गणेश याग यज्ञ, होमहवन, जन्मकाळ, पालखी नगर प्रदक्षिणा झाल्यानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली होती.
श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट तहशिलदार प्लॉट, शिरगुपी रोड निपाणी येथे आज रविवार दिनांक 2 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 7 ते 9 या वेळेत ह. भ. प. श्री भागवत संत महाराज नणदी यांची कीर्तन सेवा होणार आहे. तरी या सेवेचा सर्व पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घ्यावा असे ट्रस्टच्या वतीने कळविण्यात येत आहे.