निपाणी महात्मा बसवेश्वर संस्थेत गणेश जयंती उत्साहात!
प्रारंभी संस्थेचे चेअरमन श्रीकांत परमणे यांनी श्री गणेशाच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला!

निपाणी नगरी प्रतिनिधी (2)
श्री महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द सहकारी नियमित निपाणी येथे गणेश जयंती मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरी करण्यात आली कर्नाटकातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य व अग्रेसर श्री महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द सहकारी नियमित निपाणी या संस्थेच्या वतीने सर्व सण समारंभ, महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी सर्व कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात.
प्रारंभी संस्थेचे चेअरमन श्रीकांत परमणे यांनी सिद्धेश्वर स्वामी व महात्मा बसवेश्वर व श्री गणेश प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक चेअरमन डॉक्टर सी बी कुरबेट्टी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये श्री गणेशाला मानाचे स्थान आहे. आपण घरातील कोणतेही शुभकार्य करत असताना श्रीगणेशाची आराधना केली जाते. गणेशाचे पूजन सातासमुद्रापार सर्वदूर केले जाते.
कार्यक्रमास संस्थेचे व्हाईस चेअरमन श्री प्रताप पट्टणशेट्टी, संचालक डॉक्टर एस आर पाटील, श्री किशोर बाली, श्री महेश बागेवाडी, अशोक लिगाडे, सुरेश शेट्टी, सदानंद दुमाले, प्रताप मेत्रानी, सदाशिव धनगर, दिनेश पाटील, संचालिका सौ. पुष्पा कुरबेट्टी सुवर्णा पटनशेट्टी, श्रीमती विजया शेट्टी, तसेच सीईओ एस के आदन्नावर, असिस्टंट सीईओ भद्रेश फुटाणे, सुरज घोडके, महादेव बडगीर, महेश शेट्टी, सौ विद्या कमते, तसेच कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजाता जाधव यांनी केले तर उपस्थितांचे आभार आभार राजेंद्र मगदूम यांनी मानले.