निपाणी हरी नगर येथे घरगुती गॅसचा स्फोट!
75 हजारांचे आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही!

निपाणी नगरी प्रतिनिधी (2)
निपाणी हरी नगर दुसरी गल्ली येथे घरगुती गॅसचा भडका उडाल्याने घराला आग लागली या आगीमध्ये जवळपास 75 हजार रुपयाचे नुकसान झाले या आगीत वापरातील व ठेवणीचे कपडे, वायरिंग साहित्य, भांडी तसेच प्रापंचिक साहित्याचे नुकसान झाले शिवाजी दशरथ लाड असे घर मालकाचे नाव आहे.
याबाबत घटनास्थळावरून तसेच निपाणी अग्निशामक दलाकडून समजलेली अधिक माहिती अशी की शिवाजी दशरथ लाड यांचे हरी नगर दुसरी गल्ली येथे राहते घर आहे. रविवारी सकाळी पावणे आठच्या सुमारास घरातील गॅसचा अचानक भडका उडाला त्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले. ह्या आगीमध्ये घरातील किंमती कपडे वायरिंग साहित्य भांडी तसेच प्रापंचिक साहित्य जळून खाक झाले या घटनेची माहिती येथील नागरिकांनी निपाणी अग्निशामक दलाला दिली. त्यानुसार निपाणी अग्निशामक दलाचे ठाणाधिकारी वाय बी कौजलगी, एस आय खिचडी, डी एल कोरे, मोमीन, यु एम मठपती यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे जवळपास 2:15 लाख रुपयाची हानी वाचली. शिवाजी लाड यांच्या घरामध्ये लग्न कार्याची लगबग चालू असतानाच ही घटना घडल्याने नागरिक हळहळ व्यक्त करत होत आहे.