आपला जिल्हाकृषीक्रीडागुन्हाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

“भरारी 2025” निपाणी मराठा मंडळाचे भव्य वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (3)

निपाणी मराठा मंडळ संचलित, बालवाडी, मराठी विद्यानिकेतन प्राथमिक शाळा आणि निपाणी मराठा मंडळ हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक वर्ष 2024-25 चे वार्षिक स्नेहसंमेलन “भरारी 2025” दि.01 फेब्रुवारी 2025 रोजी उत्साहात संपन्न झाले.

कार्यक्रमाची सुरुवात मराठा मंडळ संस्थेच्या नव्याने खरेदी केलेल्या वाहनाच्या पूजनाने झाली. त्यानंतर उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुणे माजी जिल्हा पंचायत सदस्या सुमित्रा उगळे  सुप्रिया दत्तकुमार पाटील,  माजी नगराध्यक्ष शुभांगी जोशी, शहर पोलीस स्टेशनच्या पी.एस.आय उमादेवी गौडा, संगीता रवींद्र कदम, आणि ज्योती राजेश कदम यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

स्नेहसंमेलनाची वैशिष्ट्ये-

* यावर्षी कार्यक्रमाचे यूट्यूब लाइव्ह प्रसारण करण्यात आले, ज्यामुळे बाहेरगावी आणि विदेशात असलेल्या माजी विद्यार्थ्यांनाही कार्यक्रमाचा आनंद घेता आला.* केवळ मनोरंजनात्मक कार्यक्रम नसून विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.*एकूण चार गटांमध्ये चाळीस हजार हून अधिक रुपयांची बक्षीस रक्कम वाटप करण्यात आली.* या स्पर्धांमध्ये एकूण 32 स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धेचे परीक्षण सिद्धेश्वर विद्यालय, कुर्ली येथील शिक्षक डान्स कोरिओग्राफर एम.बी. खिरुगडे यांनी पार पाडले.

गौरव व सत्कार समारंभ-

निपाणीतील पत्रकार बंधूंचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी योगदान दिलेल्या व मराठा मंडळाला नेहमी मदत करणाऱ्या व्यक्ती, विजय मैत्रानी (इंडियन गॅस), सुप्रसिद्ध आचारी – राजू भरमकर, CCTV महेश पाटील इचलकरंजी, सुनील अंकुशे, स्वप्निल ग्राफिक्स, आणि नितीन जाधव इलेक्ट्रिशियन, साऊंड सिस्टीम विनायक पोवार यांना विशेष सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.

———————————————–

स्पर्धेचा निकाल आणि प्रायोजकांचे योगदान-

गट 1: (इयत्ता बालवाडी आणि पहिली)

1. प्रथम क्रमांक- अभ्यासाला सुट्टी नसते  

2. द्वितीय क्रमांक- घड्याळाच्या काट्यावर  

3. तृतीय क्रमांक: छोटा बच्चा समझ के काम को  

प्रायोजक -प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे बक्षीस – राहुल दत्तात्रय बाडकर (हॅपी मेडिकल) यांचेकडून यांचे कडून सर्व शिल्ड  दिशा कॉम्प्युटर  

गट 2: (इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी)

1. प्रथम क्रमांक: मै निकला गड्डी लेके (चौथी)  

2. द्वितीय क्रमांक: शेतकऱ्यांचे नृत्य (चौथी)  

3. तृतीय क्रमांक: दर्या किनारे (तिसरी)  

4. उत्तेजनार्थ: दादाजी की छडी हू मै (दुसरी)  

प्रायोजक:  प्रथम क्रमांकाचे बक्षीस – ओंकार रवींद्र शिंदे (निपाणी)   द्वितीय क्रमांकाचे बक्षीस – मनीषा किरण पाटील (कोल्हापूर)  तृतीय क्रमांकाचे बक्षीस – संदेश सुरेश घाटगे (यरनाळ)  

——————————————–

गट 3: (इयत्ता पाचवी, सहावी, सातवी)

1. प्रथम क्रमांक: – नाच गं बया (सहावी) व अंबाबाई गोंधळाला ये (सातवी) विभागून 

2. द्वितीय क्रमांक: एगिरी नंदिनी (सहावी व सातवी)  

3. तृतीय क्रमांक: शिवबा तीन (पाचवी)  

4. उत्तेजनार्थ: गणपती नृत्य (पाचवी)  

प्रायोजक-प्रथम क्रमांकाचे बक्षीस – स्मिता बळीराम चव्हाण   द्वितीय व तृतीय क्रमांकाचे बक्षीस – सत्यजित अरुण वैद्य   उत्तेजनार्थ बक्षीस – स्मिता प्रवीण कराळे  सर्व शिल्ड – दिशा कॉम्प्युटर  

———————————————–

मोठा गट (आठवी ते दहावी)

1. प्रथम क्रमांक:  सुकन्या वाडकर आणि दिशा पाचपुरे ग्रुप (मदन मंजिरी लावणी-इयता 10वी ) आणि “मैं देश की बेटी हुं” – (इयत्ता आठवी) विभागून…. 

2. द्वितीय क्रमांक: माझा भीमराव – (नववी ‘अ’च्या विद्यार्थिनींचे नृत्य)  

3. तृतीय क्रमांक- साउथ इंडियन नृत्य – (नववी ‘ब’)  

  सौजन्य अंकुशे ग्रुप लावणी – (आठवी ‘ब’) …..

प्रायोजक आणि देणगीदार:

 प्रथम क्रमांकाचे बक्षीस (₹7001): माजी विद्यार्थी केतन बोरगावे (हॉटेल सार्थक, निष्ठा, स्वामी समर्थ भोजनालय)

 द्वितीय क्रमांकाचे बक्षीस (₹5001): क्लासिक ट्रेडर्स इलेक्ट्रिकल्स अँड इलेक्ट्रॉनिक्स (इनामदार यमगर्णी) 

 तृतीय क्रमांकाचे बक्षीस (₹3001): उद्योजक सुशांत हिरगुडे 

 शिल्ड प्रायोजक-राज हिरेकोडी (हॅपी केक चे मालक)  

विशेष आर्थिक सहाय्य: शाळेसाठी विशेष देणगी (₹21,121): जन आधार को-ऑपरेटिव सोसायटी कडून अध्यक्ष-फरास अब्बास, आनंदराज मोबाईल, सलून 8 (राहुल कांबळे), रोहित पटेल, मेहुल पटेल, शरावती पेट्रोल पंप, पप्पू पावले, अमित बाचणकर, आणि संभाजी जामदार  

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष योगदान- कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मराठा मंडळाचे अध्यक्ष रवींद्र रघुनाथराव कदम, शिक्षण समितीचे चेअरमन श्री. राजेश रघुनाथराव कदम, सौ.संगीता रवींद्र कदम आणि ज्योती राजेश कदम. स्नेहसंमेलन अध्यक्ष एन टी खराडे ,.उपाध्यक्ष जे आर खपले यांची मोलाची साथ लाभली.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. ए. एम. यादव  यांनी केले; तर श्री जे.आर. खपले यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

एक अविस्मरणीय सोहळा :

स्नेहसंमेलन “भरारी 2025” केवळ मनोरंजनासाठी नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा आणि सामाजिक एकात्मतेला बळ देणारा एक संस्मरणीय कार्यक्रम ठरला.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!