हिंदवी स्पोर्ट्स क्लब HPL सीजन 11 रोहन कोठेवाले चषक उद्घाटन सोहळा उत्साहात!

निपाणी नगरी प्रतिनिधी (3)
दि. २ फेब्रुवारी २०२५ रोजी HPL सीजन 11 रोहन कोठेवाले चषक स्पर्धेचे उद्घाटन विरुपाक्षलिंग समाधी मठाचे मठाधिपती प्राणलिंग महास्वामीजींच्या अमृतहस्ते संपन्न झाले. या वेळी प्रमुख मान्यवर तसेच स्पर्धेला पाठबळ देणाऱ्या प्रतिष्ठित व्यक्तींचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटन करताना परमपूज्य प्राणालिंग स्वामीजी यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांचा सत्कार उद्योजक श्री रोहन कोठीवाले यांच्या हस्ते करण्यात आला. आपल्या प्रेरणादायी मार्गदर्शनपर भाषणात स्वामीजीं म्हणाले निरोगी जीवनासाठी आणि आरोग्य चांगले राखण्यासाठी व्यायाम अनिवार्य आहे, आणि हा व्यायाम खेळाच्या माध्यमातून सहज साध्य होतो. समाजातील दात्यांनी खेळासाठी नेहमीच योगदान द्यावे. धन संचय करून ठेवण्यापेक्षा त्याचा योग्य वापर सत्कर्मासाठी करावा, असा मौलिक संदेश त्यांनी दिला.
हिंदवी स्पोर्ट्स क्लब हा निपाणीतील एक अग्रगण्य क्रिकेट क्लब असून, गेल्या अकरा वर्षांपासून नवोदित खेळाडूंना घडविण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे. या क्लबमधील खेळाडूंनी टेनिस बॉल क्रिकेट आणि रणजी क्रिकेट यांसारख्या विविध स्पर्धांमध्ये स्वतःचा ठसा उमटवला आहे.
कार्यक्रमाचे औचित्य साधून उपस्थित मान्यवर रोहन कोठीवाले (RKD Developer) अमरजीत पाटील (हॉटेल अमर प्युअर व्हेज, निपाणी) संभाजी जामदार (उद्योजक) आकाश पाटील (आनंदराज मोबाईल उद्योजक) सचिन ठगरे (श्री गणेश इलेक्ट्रिकल, निपाणी) विशाल मांगलेकर (पूजा डायनिंग, निपाणी) तुषार माळी (माळी मार्केटिंग) राघवेंद्र खोत (प्रथमेश सेल्स, निपाणी) राजू भोपे (LB मोबाईल शॉपी, निपाणी) खलीद खान (कादरी फर्निचर, निपाणी) अमर वाडकर (ओम हिंदुस्तान बेकरी, निपाणी) यांचा हिंदवी स्पोर्ट्स क्लब तर्फे यथोचित सन्मान करण्यात आला.
या सोहळ्याला हिंदवी स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष महेश जाधव, मनोगत व्यक्त करताना म्हणाले हिंदवी स्पोर्ट्स क्लब हा निपाणीतील एकमेव क्लब आहे जिथे संपूर्ण वर्षभर खेळाडूंचे सराव शिबिर सुरू असते. उदयोन्मुख खेळाडूंनी बाहेरच्या स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करावी, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. खेळ हे केवळ मनोरंजन किंवा स्पर्धा जिंकण्याचे साधन नाही, तर शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी आवश्यक आहे. नियमित सरावामुळे तंदरुस्ती टिकून राहते, मन शांत राहते आणि आत्मविश्वास वाढतो. तसेच, संघभावना आणि शिस्त यांचा विकास होतो. व याच उद्देशाने हिंदवी स्पोर्ट्स क्लब कार्यरत आहे. येथे आम्ही केवळ चांगले खेळाडू तयार करत नाही, तर त्यांना आयुष्याच्या मैदानातही यशस्वी बनवण्याचा प्रयत्न करतो. आमच्या खेळाडूंनी सुपर लीग, टेनिस बॉल क्रिकेट आणि रणजी स्तरावर चांगली कामगिरी करावी, यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत.
यावेळी राजू मगदूम, शुभम नागेश,अमोल माळी, हेमंत शिंदे,विश्वास पाटील, रणजीत मगदूम, अजित तिबिले, समीर मुजावर, इमरान , संजय दबडे,अत्तार, तोमेश होनमाने, तसेच स्पर्धेत सहभागी असलेल्या चारही संघांचे स्पॉन्सर आणि सर्व खेळाडू उपस्थित होते.
सुप्रसिद्ध दीव्यांग खेळाडू नरेंद्र (बबलू) मांगोरे यांचा विशेष सत्कार…
अकराव्या सिझनच्या उद्घाटन प्रसंगी निपाणीतील सुप्रसिद्ध खेळाडू नरेंद्र (बबलू) मांगोरे यांचा सत्कार करण्यात आला. त्यांनी भारताकडून दीव्यांग क्रिकेट स्पर्धेमध्ये नुकत्याच श्रीलंकेत झालेल्या चॅम्पियन ट्रॉफी मध्ये विजय मिळवला. निपाणी नव्हे तर संपूर्ण बेळगाव जिल्ह्यातील एकमेव खेळाडू म्हणून त्यांनी आपल्या देशाचे प्रतिनिधित्व केले. हिंदवी स्पोर्ट्स क्लबतर्फे त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आशिष भाई शाह यांचे विशेष आभार मानण्यात आले…
कार्यक्रमाच्या शेवटी जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आशिषभाई शहा यांचे आभार मानण्यात आले, कारण त्यांच्या सहकार्यामुळे या स्पर्धेसाठी मैदान उपलब्ध झाले आहे. भविष्यातही हिंदवी स्पोर्ट्स क्लब उत्कृष्ट खेळाडू घडवत राहील, असा विश्वास महेश जाधव यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन -श्री संतोष पाटील यांनी केले. तर आभार प्रदर्शन मेजर महादेव शिंत्रे यांनी केले.