मोठी बातमी- शिरगुपी पांगीर रस्त्यावर गव्यांचे दर्शन!
आज सकाळी साडेसहा ते पावणे सातच्या दरम्यान तीन गव्यांचे दर्शन!!

निपाणी नगरी प्रतिनिधी (5)
आज बुधवार दिनांक 5 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसहा ते पावणे सातच्या दरम्यान शिरगुपी पांगीर ओढ्याजवळ गवे रेडे निदर्शनास आले आहेत.
घटनास्थळावरून बघितलेल्या व्यक्तीच्या म्हणण्यानुसार साळुंखे सरकारच्या शेतापासून खालील बाजूस गवे येत सरळ विलास रक्ताडे, कुंभार यांच्या शेतामधून खालील बाजूस गवे पसार झाल्याचे सांगण्यात येत असून एकूण तीन गवे असल्याचे प्रथम दर्शनी पाहणाऱ्या लोकांनी सांगितले आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून हाता तोंडास आलेल्या पीकांचे नुकसान होऊ नये म्हणून ताबडतोब गवेरेड्याचा बंदोबस्त करण्याची मागणी शिरगुपी पांगीर बुदलमुख गावातील नागरिकांन कडून होत आहे.
या संदर्भात वन विभागाशी संपर्क साधला असता त्यांनी योग्य ती खबरदारी घेत त्याचा बंदोबस्त करण्याची ग्वाही दिली आहे.