आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

शिरगुपी येथील प्रगतशील शेतकऱ्यांचा अभ्यास दौरा!

निपाणी रयत संपर्क केंद्राच्या सहकार्याने अरभावी रयत संपर्क केंद्रास भेट!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (5)

केंद्र शासनाच्या व राज्य शासनाचे महत्त्व कृषी योजनेनुसार प्रत्येक शेतकरी कुटुंबाचे उत्पन्न दुप्पट होण्याच्या दृष्टिकोनातून अनेक सकारात्मक पावले उचलली जात असून त्याची काही प्रमाणात परिणाम देखील दिसून येत असून. आज आपल्या सारख्या कृषीप्रधान देशात शेतीला अन्यन्य साधारण महत्त्व असले तरी आज हवामानातील अनेक बदलामुळे शेतकरी राजा हवालदील झाला आहे.‌ त्या सर्व शेतकरी बांधवांना एक प्रकारे ऊर्जा प्राप्त करून देण्यासाठी निपाणी शेती विभागा कडून शिरगुपीतील प्रगतशील शेतकऱ्यांचा अभ्यास दौरा आरभावी येथील शेती संशोधन केंद्रामध्ये क्रॉप डायव्हर्सिफिकेशन प्रोग्राम (Crop Diversification Program) अंतर्गत बुधवारी आयोजित केला होता.

प्रारंभी सकाळी निपाणी शेती केंद्राच्या माध्यमातून एकूण 40 हुन जास्त शेतकरी तीन गाड्यांमधून संशोधन केंद्राकडे रवाना झाले. प्रारंभी आरभावी शेती संशोधन केंद्राच्या कृषी अधिकारी खाजा रुबीना यांनी स्वागत करून कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यावेळी ए डी ए मंजुनाथ कित्तूर, ए.डी.ए. लिला कौजगेरी उपस्थित होते.

पहिल्या सत्रामध्ये घटप्रभा विशेष पशुपालन संगोपन अधिकारी डॉ.सचिन गोंधळी यांनी शेतकऱ्यांना संबोधित करताना सांगितले की राज्य शासनाच्या अनेक योजनेतून शेतीपूरक व्यवसाय करून आपण आपले शेतीतील उत्पन्न दुप्पट करू शकतो. डेअरी व्यवसायासह म्हैसपालन, पशुपालन, मेंढीपालन, कुक्कुटपालन या व अशा प्रकारचे शेतीपूरक व्यवसाय करून आपण आपले जीवनमान उंचावणे आज सहज शक्य आहे. पण या सर्व व्यवसायाची आपण आपल्या केंद्रातून योग्य ती माहिती घेऊन योग्य ते नियोजन केल्यास आपणास अनेक संधी उपलब्ध असल्याचे सांगितले. पुढे याच सत्रामध्ये कित्तूर राणी चन्नम्मा विद्यालयाचे प्रा. डॉ. दिलीपकुमार मसुती यांनी बीज संस्कार विषयी मार्गदर्शन करताना सांगितले. आज आपण नगदी पीक म्हणून तंबाखू व ऊस या पिकाकडे वळत असलो तरी. आपणास आज पुरातन काळापासून चालत आलेले जवारी बिजांकुर संग्रहित करून ते वाचवणे काळाची गरज असल्याचे सांगितले. तसेच बिजांकुर व्यवस्थित निपजण्यासाठी पेरणीपूर्वी ट्रायकोडार्मा, रायझोबियम, यासारखी बुरशीनाशक वापरून गुळाच्या पाण्याचा प्रति किलो तीन ते पाच ग्रॅम छिडकाव केल्यास आपले उत्पादन वाढू शकते. सोयाबीन, मक्का, यासारख्या पिकाचा देखील विचार करू शकतो.

दुपारच्या दुसऱ्या सत्रामध्ये  निपाणी कृषी संशोधन केंद्राचे अधिकारी श्री संजय पाटील यांनी तंबाखू व ऊस पिका संदर्भात प्रदिर्घ मार्गदर्शन केले. जरी आज तंबाखूचे एकंदरीत क्षेत्र कैक पटीने कमी होत असली तरी, तंबाखू वरील निकोटिन सारख्या घातक घटकाचा जनावरांच्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम घडत असल्यामुळे. तंबाखूच्या पानातून प्रोटीन, तंबाखूच्या बियापासून तेल काढणे, मेडिकलच्या क्षेत्रामध्ये देखील तंबाखूतील घटकांनी शिरकाव केल्यामुळे अनेक रोगांनी त्रस्त असणाऱ्यांना नवसंजीवनी मिळाली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने संतान प्राप्ती, मधुमेह, कॅन्सर, हृदयरोग असणाऱ्या रुग्णांना तंबाखूतील घातक द्रव्यांचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे.

ऊस पिका संदर्भात मार्गदर्शन करताना डॉ. संजय पाटील यांनी पीपीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना समजेल अशा सोप्या भाषेमध्ये अनेक सुधारित बियांना संदर्भात माहिती देऊन पूर्वी प्रचलित असलेले पण काही अपरिहार्य कारणामुळे दुर्लक्षित झालेल्या 13374 हे सुधारित ऊस बियाणांच्या क्रांतिकारक वापराने कारखान्याच्या रिकव्हरी संदर्भातील होत असलेली चुकीची अटकळ, व शेतकऱ्यांना मिळणारा प्रति टन उतारा चांगला असल्यामुळे आज अनेक ठिकाणी उसाचे ही सुधारित वाण वापरून शेतकऱ्यांनी प्रगती साधली असल्याचे सांगितले.

शिरगुपी येथील शेतकऱ्यांनी देखील पीक वाडी संदर्भात, शेतीपूरक व्यवसाय संदर्भातील आपल्या मनातील असलेल्या शंकांचे निरसन करून घेतले. सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने मनोगत व्यक्त करताना प्रगतशील शेतकरी विलास डाफळे यांनी प्रथम आजचे सर्व चर्चासत्र मराठी व हिंदी मध्ये उपलब्ध करून दिल्याबद्दल संयोजकांचे आभार मानले. तसेच कार्यक्रमाच्या नेटक्या नियोजनामुळे शेतकऱ्यांच्या ज्ञानात भर पडली असल्याचे सांगितले.

यावेळी निपाणी रयत संपर्क केंद्राचे चेतन हत्ती, समन्वयक दिनकर पोवार यांच्यासह अनिरुद्ध कुलकर्णी, रामा हजारे, बाळासो हजारे, अमर म्हाकवे, नामदेव कांबळे, विठ्ठल नागांवकर, विजय पोवार, साईनाथ कांबळे, सुधाकर हजारे, धनाजी जाधव,राजू कोकाटे, राजू बुवा, मच्छिंद्र चौगुले, रमेश गोविंद कांबळे, प्रल्हाद कांबळे, बाळासो कृष्णा हजारे, बाजीराव डाफळे, दिलावर मुल्ला, हुसेन मुल्ला, प्रकाश डाफळे, पांडुरंग जाधव, संभाजी चव्हाण, बाळासो आप्पासो हजारे, कृष्णा कांबळे, साईनाथ कांबळे, सुधाकर बुवा, अप्पासो देसाई, आनंदा हजारे, रमेश अण्णाप्पा कांबळे, बाळासाहेब हजारे, उत्तम रक्ताडे, दिनकर कुंभार, ज्योतिबा चव्हाण , मारुती हजारे, गणेश हजारे, राहुल चव्हाण, मारुती राऊ हजारे, गौतम कांबळे, सतीश घुणके, रामचंद्र हजारे, शशिकांत यादव, उत्तम रक्ताडे, याच्यासह निपाणी रयत संपर्क केंद्रातील अधिकारी तसेच अरभावी रयत संपर्क केंद्राचे सर्व अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व शेतकऱ्यांसाठी केंद्रातर्फे जाणे येण्यासाठी गाडी, नाश्ता, जेवण, चहा याची योग्य ती सोय केली होती. या अभ्यास दौऱ्या संदर्भात सर्व शेतकऱ्यांनी निपाणी रयत संपर्क केंद्राचे कर्मचारी चेतन हत्ती व समन्वयक श्री दिनकर पोवार यांचे विशेष आभार मानले.


टीप- उद्या गुरुवार दिनांक सहा फेब्रुवारी रोजी सकाळी साडेदहा वाजता अभ्यास दौऱ्यासाठी कणेरी कृषी संशोधन केंद्र कणेरी मठ येथे जायचे असून सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांतर्फ. करण्यात येत आहे

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!