कन्या शाळेत ग्रामीण संस्कृती व पारंपारीक व्यवसायांचे प्रात्यक्षिक-प्रदर्शन!

निपाणी नगरी प्रतिनिधी (5)
दि फिमेल एज्युकेशन सोसायटी संचलित एस-बी. एस. कन्या शाळा व गर्ल्स मराठी कॉन्व्हेंट स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेत ग्रामीण संस्कृती व पारंपारिक व्यवसाय यांचे प्रदर्शन इयत्ता बालवाडी लहान गट, मोठा गट व् पहिलीच्या विद्यार्थीनींनी सादर केले. लोप पावत असलेल्या पारंपारिक व्यवसायाची नविन पिढीला ओळख करून दिली. यामध्ये पहाटेच्या वेळी पिंगळा, वासुदेव येऊन सर्व लोकांना हरिनामाच्या गजराने उठवित, जात्यावर ओव्या गात, दळण दळत, चुलीवर भाकरी करणे, रवीच्या सहाय्याने ताक घुसळणे, खलबत्ता व पाटा वरंवटा घेऊन मसाला वाटणे, उखळात मिरची कांडणे, वैद्य, सोनार, चांभार, कुंभार, सुतार, लोहार, कासार, शेतकरी, धोबी, शिंपी, सावकार असे पारंपारिक व्यवसाय तसेच भातुकली, काचा कवड्या, खड्यांचा खेळ, जिबली या खेळांचे प्रात्यक्षिक मुलीनी सादरीकरणातून केले. पहाटेच्या वेळी दारामध्ये सडा रांगोळी करणे, तुळशीचे पूजन करणे, जपमाळ घेऊन भगवंताचे नामस्मरण करणे, धार्मिक वाचन करणे, अशा वेगवेगळ्या पध्दतीच्या वेशभूषा परिधान करून ग्रामीण संस्कृती व पारंपारिक व्यवसायाचे प्रदर्शन घडवले.
या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्य आधारस्तंभ संस्थेचे चेअरमन आशिषभाई शाह यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी संस्थेचे संचालक मा.श्री. प्रसन्नकुमार दोशी व मा. सौ. शामली दोशी तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. सौ. एस. जे. पाटील आणि मुख्याध्यापक मा. श्री. आर. पी. बामणे उपस्थित होते. कार्यक्रम उत्तमरित्या पार पाडण्यासाठी पालकांनी मोलाचे सहकार्य केले.
यावेळी कार्यक्रमाप्रसंगी जे.एम. शिंत्रे, जे. सी. चंद्रकुडे, जे. ए. कुरबेट्टी, एस. डी. काळे, के. एसः भादूले, पी. एम. कवाळे, यु.बी. नागावे, एम.एम. चिक्कोडे, एस. आर. इराज सी. एम. बाडकर, ए. आर. पाटील, ए.डी. पाटील, पी. ए. निगवे, एस. आर. घाटगे, आर. वी. घाटगे, आर. वी. मधाळे, -पी. आर. पाटील, ओ.एम. कुलकर्णी, के. एन. मंगसुळी, शशिकांत हवालदार, सुभाष माळी, एस. पी. तिप्पे, यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.