कन्या शाळेत हळदीकुंकू समारंभ व बोरन्हाणं सोहळा संपन्न!

निपाणी नगरी प्रतिनिधी (5)
दि फिमेल एज्युकेशन सोसायटी संचलित सौ भागीरथी बाई शाह कन्या शाळा व गर्ल्स मराठी कॉन्व्हेंट स्कूल या शाळेच्या वतीने माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील रथसप्तमी या विधीचे औचित्य साधून शाळेत हळदीकुंकू व इयत्ता बालवाडी लहान गट, मोठा गट या विद्याथ्यीनींचे बोरन्हाणं संपन्न झाले. या कार्यक्रमा प्रसंगी शाळेच्या संचालिका डॉ .सौ प्रवीणाभाभी शाह,व सौ.शामली दोशी उपस्थित होत्या.
यावेळी डॉ. प्रवीणाभाभी शाह यांनी हळदीकुंकू व बोरन्हाणं याचे धार्मिक व शास्त्रीय महत्त्व पटवून सांगितले, शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. सौ एस जे. पाटील यांनी सुध्दा हळदीकुंकू व बोरन्हाणं या सणाचे धार्मिक महत्त्व सांगितले. पूर्वी महिलांना घरा बाहेर पड़ता येत नव्हते. त्यामुळे अशा हळदीकुंकू कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांच्या विचारांची देवाण-घेवाण होत असे. त्याचबरोबर आपली संस्कृती आपल्या मुलांना समजली पाहिजे. याचे संस्कार आपणच मुलांना दिले पाहिजेत असे त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. या कार्यक्रमा प्रसंगी गर्ल्स मराठी कॉन्व्हेन्ट स्कूलचे मुख्याध्यापक श्री आर. पी. बामने उपस्थित होते. सर्व माता पालक उपस्थित होत्या. या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष आशिषभाई शाह यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रम प्रसंगी जे एम शिंत्रे. जे सी चंद्रकुडे, जे. ए. कुरबेट्टी, के. एस भादुले, एस. डी काळे, पी. एम् कवाळे, यु.बी नागावे, एम. एम चिक्कोडे, एस. आर. इराज, सी.एम. बाडकर, ए. आर पाटील, ए.डी. पाटील, व्ही.ए. निगवे, एस आर, घाटगे, आर, वी. घाटगे, आर. वी मधाळे, पी आर पाटील, ओ. एम. कुलकर्णी, के.एन. मंगसुळी, शशिकांत हवालदार, सुभाष माळी,एस पी तिप्पे, यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.