निपाणीत “मराठा व्यवसाय संघाचा” मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न!
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते व बिजनेस कोच अर्णव पाटील-नाशिक यांनी व्यावसायिक मार्गदर्शन केले!

निपाणी नगरी प्रतिनिधी (7)
येथे मराठा व्यवसाय संघाचा व्यावसायिक मेळावा उत्साहात पार पडला. यावेळी क्षितिज गायकवाड-बैतूल मध्यप्रदेश, पंकज पाटील, बुऱ्हाणपूर मध्यप्रदेश, संदीप पाटील, सुरत गुजरात हे प्रमुख उपस्थित होते.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तिचे पूजन व रोपास पाणी घालून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. संघाचे सचिन जाधव यांनी स्वागत केले. प्रास्ताविक चंदन भोपे, संजय जबडे यांनी केले. यावेळी मराठा व्यवसाय संघ निपाणीतर्फे ज्येष्ठ व्यावसायिक जयवंत मोरे, भाऊसो शिंदे, अशोक मोहिते, चंद्रकांत जासूद, सुकुमार भाट यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच यशस्वी मराठा व्यावसायिक बंधू भगिनींचा शाल आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते व बिजनेस कोच अर्णव पाटील-नाशिक यांनी व्यावसायिक मार्गदर्शन करताना म्हणाले व्यक्तीला त्याच्या आवडी, क्षमता आणि संधींचा विचार करून योग्य करिअर निवडण्यासाठी दिलेले मार्गदर्शन.आपल्या आवडी, कौशल्ये आणि स्वभाव समजून घेणे महत्त्वाचे आहे.विविध क्षेत्रे, त्यातील संधी आणि भविष्यातील मागणी यांचा अभ्यास करावा.आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि कौशल्यांची माहिती घ्यावी. तज्ज्ञ, शिक्षक, आणि करिअर काउंसलर यांच्याशी चर्चा करणे उपयुक्त ठरते. इंटर्नशिप, वर्कशॉप आणि फ्रीलान्स प्रोजेक्ट्स करून अनुभव घ्यावा. मार्केट ट्रेंड्स, स्पर्धा परीक्षा आणि करिअर संधींचे निरीक्षण ठेवावे. नवीन कौशल्ये शिकत राहणे आणि बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेणे गरजेचे आहे. प्रोफेशनल लोकांशी संपर्क वाढवणे आणि त्यांच्याकडून शिकणे फायदेशीर ठरते. करिअर निवडताना आर्थिक स्थिरतेचा विचार करणे आवश्यक आहे. अडचणी आल्या तरी त्यांना सामोरे जाण्याची मानसिकता ठेवल्यास यश निश्चित आहे. व्यवसाय मार्गदर्शन योग्य प्रकारे घेतल्यास करिअरची योग्य दिशा मिळते आणि उज्ज्वल भविष्यासाठी मदत होत असते असे सांगितले.
कार्यक्रमाच्या ठिकाणी जवळपास ४० हुन अधिक खरेदी विक्रीसाठी व्यावसायिक स्टॉल लागले होते. हॉटेल व्यवसायिक पिंटू बोधले यांनी आभार मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय जबडे, सुंदर साळुंखे, सचिन जाधव, सुभाष पाटील, शिवाजी पाटील, रोहन तोडकर, किरण सरदेसाई, दीपक बगाडे, धनंजय जाधव, रवींद्र मोरे, अविनाश बाबर, चारूदत पावले, अनिल भिलुगडे, विशाल कुदळे, विपुल केसरकर, विजय तिप्पे, सचिन पाटील यांच्यासह अनेक सदस्यांनी परिश्रम घेतले. यावेळी निपाणी, बेळगाव, कोल्हापूर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने बंधू भगिनी उपस्थित होते.