मराठा मंडळ निपाणी संचलित, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, (I.T.I) निपाणी येथे वार्षिक क्रीडा स्पर्धांना प्रारंभ!
कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्याध्यापक श्री.डी.डी हळवणकर व श्री. बी. आर मोहिते यांच्या हस्ते करण्यात आले.

निपाणी नगरी प्रतिनिधी (7)
06 फेब्रुवारी 2025, पासून मराठा मंडळ औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय.टी.आय), निपाणी येथे वार्षिक क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन मराठा मंडळ हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री.डी.डी हळवणकर व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री. बी. आर मोहिते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्री. हळवणकर यांनी विद्यार्थ्यांना खेळाचे शालेय जीवनातील महत्त्व व आरोग्यासाठी होणारे फायदे याविषयी मार्गदर्शन केले.
या स्पर्धेसाठी मराठा मंडळ आय.टी.आय चे प्राचार्य श्री. सचिन कुलकर्णी व क्रीडा अधिकारी श्री. संदीप नाईक, तसेच सहकारी शिक्षक श्री. अविनाश भोसले, श्री. विशाल यादव, श्री. भागेश कुलकर्णी, श्री. अमित पठाडे, श्री. संजय अमृतस्मानावर, श्री. सुधीर जोशी, श्री. विलास पाटील, श्री. एकनाथ डवरी, श्री. अमित कदम उपस्थित होते. स्पर्धेचे पंच म्हणून हायस्कूल विभागाचे श्री. जयहिंद खपले व प्राथमिक विभागाचे श्री. एस. एस. पाटील यांनी जबाबदारी पार पाडली.
या क्रीडा स्पर्धेसाठी मराठा मंडळ संस्थेचे अध्यक्ष श्री. रवींद्र कदम आणि चेअरमन श्री. राजेश कदम यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.