मोहनलाल दोशी विद्यालयात महिला दिन उत्साहात संपन्न!
यावेळी प्रमुख वक्त्या व्ही के परीट यांचे मार्गदर्शन लाभले!

निपाणी नगरी प्रतिनिधी (8) अर्जुननगर
येथील मोहनलाल दोशी विद्यालयात महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख वक्त्या व्ही के परीट यांनी विविध क्षेत्रातील यशस्वी झालेल्या विविध महिलांचे उदाहरण देऊन महिलांच्या कार्याचे कौतुक केले व महिला सुरक्षिततते बाबत चिंता व्यक्त केली. प्रारंभी प्रास्ताविकातून यु एम सातपुते यांनी महिला दिनाचा इतिहास सांगितला,श्रेया गायकवाड, हर्षदा बल्लोळी, छाया श्रीखंडे, सहेजता जाधव, श्रावणी टिंगरे, यांनी मनोगतातून आपल्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून मुख्याध्यापिका एस एम गोडबोले यांनी महिलांना आयुष्यात नेहमी मानसन्मान मिळाला पाहिजे असे मत मांडले. याप्रसंगी व्यासपीठावर जेष्ठ शिक्षक आर एस भोसले, शिक्षक प्रतिनिधी ए डी लकमले, कर्मचारी प्रतिनिधी एस आर भोपळे आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन डी बी बेनाडे यांनी केले तर आभार आर डी देसाई यांनी मानले. कार्यक्रमाला जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री आशिषभाई शाह यांच्यासह सर्व संचालकांचे प्रोत्साहन लाभले