देवचंद कॉलेज, अर्जुननगर इंग्लिश विभागामार्फत एम.ओ.यु.(MoU) अंतर्गत विविध स्पर्धा उत्साहात संपन्न!

निपाणी नगरी प्रतिनिधी (8)
देवचंद कॉलेज, अर्जुननगर इंग्लिश विभागामार्फत MoU करारांतर्गत स्पेल चेक कॉम्पिटिशन आणि स्टोरी टेलिंग कॉम्पिटिशन चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये गोगटे वाळके महाविद्यालय बांदा , डॉ. घाळी कॉलेज, गडहिंग्लज, शिवराज कॉलेज गडहिंग्लज आणि देवचंद कॉलेज अर्जुननगर मधून विद्यार्थ्यानी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्पर्धेचे निमंत्रक प्रा. बी जी पाटील यानी केले. आजच्या स्पर्धात्मक युगामध्ये टिकण्यासाठी उत्तम इंग्लिश बोलणे आणि स्वताच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करणे हे अतिशय गरजेचे आहे आणि त्यासाठी अशा स्पर्धा आयोजित करणे खूप गरजेचे आहे असे मत प्राचार्य जी डी इंगळे यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले. कार्यक्रमाचे आभार प्रा. ज्योती बुवा यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. दीपा मडिवाळ यांनी केले. सदर कार्यक्रमासाठी प्रा. स्मिता पाटील, प्रा. मनीषा हातगिने. प्रा. विनायक वरुटे. यांचे सहकार्य लाभले. सदर कार्यक्रमासाठी प्रा. निरंजन अरोंदेकर प्रा. संदीप परीट, प्रा. संतोष कांबळे, प्रा. विशांत दानवाडे यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी हजर होते.