निपाणी नगरपालिकेच्या स्वच्छता ताफ्यात जे.सी.बी.चे आगमन!
21 लाखांचा निधी मंजूर, आमदार सौ शशिकला जोल्ले यांचे प्रतिपादन!!

निपाणी नगरी प्रतिनिधी (9)
निपाणी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी स्वच्छ शहर सुंदर शहर हा मानस डोळ्यासमोर ठेवून पंधराव्या वित्त आयोगातून 21 लाख निधीतुन जेसीबी खरेदी करण्यात आले असून यामुळे निपाणी शहराच्या स्वच्छतेला विशेष प्राधान्य देण्यात येणार असून यामुळे शहरातील कचरा समस्या लहान मोठमोठ्या गटारातील केरकचरा काढण्यास मदत होणार असून जिथे मनुष्यबळ अपूरे असेल तिथे या जेसीबीच्या साह्याने स्वच्छता करण्यात येणार असल्याची माहिती आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी दिली. जेसीबी ची पूजन करून नगरपालिकेच्या ताफ्यात दाखल करताना त्या माध्यमांशी बोलत होत्या.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून जे.सी.बी.चे विधिवत पूजन करण्यात आले.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे की स्वच्छ भारत सुंदर भारत या संकल्पनेला अनुसरून आज निपाणी नगरपालिकेच्या माध्यमातून स्वच्छता दूत म्हणून लोकार्पण सोहळ्यात त्या बोलत होत्या. यावेळी या कार्यक्रमास पालिका अध्यक्षा सोनल कोठडीया, उपनगराध्यक्ष संतोष सागांवकर, सभापती डॉ जसराज गिरे, पालिका आयुक्त दीपक हरदी, नगरसेवक जयवंत भाटले ,विलास गाडीवड्डर,राजू गुंदेशा, कावेरी मिरजे, सुजाता कदम,नीता बागडे, गिता पाटील, आशा कवळे, योगिता घोरपडे, संजय चव्हान, बंडा घोरपडे, जुबेर बागवान, राजेश कोठडिया, विजय टवळे, प्रशांत केस्ती सुरज खवरे, कृष्णकुमार माने, सुनिता माने, यांच्यासह पालिका कर्मचारी उपस्थित होते.