निपाणी मुन्सिपल हायस्कूल येथे नवीन वर्ग खोल्यांचे भुमीपूजन संपन्न!
61. 31 लाखाच्या अनुदानातून सर्व सोयीनियुक्त खोल्या उभारणार आमदार सौ शशिकला जोल्ले!

निपाणी नगरी प्रतिनिधी (9)
शाळा हे विद्येचे पवित्र मंदिर आहे. आजचा विद्यार्थी हा उद्याचा भावी नागरिक आहे.. यासाठी उत्तम वर्ग खोल्या आणि शाळा निर्माण करणे आपले कर्तव्य असून 2008 पूर्वी शाळा अंगणवाडी खोल्या या अतिशय खराब परिस्थितीमध्ये होत्या. 2008 पासून आपल्याला निपाणीच्या जनतेने आशीर्वाद केल्यानंतर सरकारी शाळेला मूलभूत सुविधा देण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे, म्युनिसिपल शाळा ही 100 वर्षांपूर्वीची शाळा असून, कर्नाटक प्राथमिक शाळेला 61 लाख 31 हजार रुपयांचा निधी शाळेच्या दोन खोल्या आणि शौचालयासाठी मंजूर झाला असून या कामाचा शुभारंभ करून आमदार जोल्ले माध्यमांशी बोलत होत्या.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आमदार जोल्ले यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नारळ फोडून कामाचा शुभारंभ करण्यात आला.
पुढे बोलताना जोल्ले म्हणाल्या, शाळा अंगणवाडी यांच्यासह सर्व घटकांचा विकास साधण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे या निधीतून शाळेला मूलभूत सुविधे बरोबरच पाण्याची समस्या लक्षात घेऊन नवीन बोअरवेल मारण्यात येणार असल्याचे सांगितले.
यावेळी या कार्यक्रमास नगरपालिका नगराध्यक्षा सौ.सोनल कोठडीया, उपनगराध्यक्ष संतोष सागांवकर, सभापती डॉ जसराज गिरे, नगरपालिका आयुक्त दीपक हरदी, नगरसेवक जयवंत भाटले, विलास गाडीवड्डर, राजू गुंदेशा, कावेरी मिरजे, सुजाता कदम, नीता बागडे, आशा टवळे, गिता पाटील, योगिता घोरपडे, संजय चव्हाण, बंडा घोरपडे, जुबेर बागवान, राजेश कोठडिया, विजय टवळे ,सुरेश खवरे, सागर मिरजे, प्रशांत केस्ती ,कृष्णकुमार माने, सुनिता माने, यांच्यासह पालिका कर्मचारी उपस्थित होते…