Entertainmentआपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

तब्बल 19.31 लाखांचे निपाणी नगरपालिकेचे शिलकी अंदाजपत्रक सादर!

कै. विश्वासराव शिंदे सभागृहात पालीका सभापती डॉ. जसराज गिरे त्यांच्याकडून सादर!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (10)

निपाणी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असणाऱ्या निपाणी नगरपालिकेच्या कै. विश्वासराव शिंदे सभागृहामध्ये आज मंगळवार दिनांक 10 मार्च रोजी पालिका सभापती डॉ. जसराज गिरे यांनी आर्थिक वर्ष 2025 26 साठीचे तब्बल 19.31 लाखांचे शिलकी अंदाजपत्रक सादर केले.

प्रारंभी पालिका आयुक्त दीपक हरदी यांनी नगरपालिका नगराध्यक्ष सोनल कोठडीया, उपनगराध्यक्ष संतोष सागांवकर व पालिका सभापती डॉ जसराज गिरे व सर्व नगरसेवक व नगरसेविकेचे हार्दिक स्वागत करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

सभापती डॉ. जसराज गिरे यांनी आपल्या जादुई पोतडीतून सन 2025-26 चे हाय लाइट्स ऑफ बजेट सादर करताना सांगितले. कर आणि सरकारी अनुदान, कॅपिटल ग्रँन्ट व इतर सर्वसाधारण जमा ही एकूण 42 कोटी 96 लाख 8 हजार 589 रुपये होण्याचा अंदाज असून महसूल मिळकत व इतर मिळकत मधून मिळालेल्या रकमेच्या विविध कामांकरिता खर्चाचा अंदाजे तपशील हा 

राजा शिवछत्रपती सांस्कृतिक भवना करीता 85 लाख, डॉ. आंबेडकर भवन जागेसाठी 45 लाख, सार्वजनिक रस्ता कामासाठी 2 कोटी 15 लाख, सार्वजनिक पथदिवे बसवण्याकरिता 38 लाख, सार्वजनिक शौचालय व मुतारीकरता 54 लाख, घनकचरा प्रक्रियेसाठी 77 लाख 62 हजार, साहित्य ठेवण्यासाठी इमारत व शेडसाठी 92 लाख, मशिनरी व वाहनांसाठी 50 लाख, गटार व चेंबर स्वच्छतेसाठी 38 लाख 38 हजार, पाणीपुरवठा विभागाकरता 1 कोटी 17 लाख 80 हजार, सार्वजनिक उद्यान करता 25 लाख, स्मशानभूमी व कब्रस्तानसाठी 30 लाख, एससी एसटी जनतेच्या विकासाकरता 3 लाख 93 हजार 488, 29% टक्के निधी आणि अनटाईड फंडातून एससी एसटी जनतेच्या विकासाकरता 19 लाख 80 हजार, व 7.5% टक्के निधी नगरपालिका फंडातून आर्थिक व इतर मागासवर्गीय जनतेच्या विकासाकरता 1 लाख 18 हजार 373 रुपये, 5 टक्के निधी नगरपालिका अनुदानातून अंगविकलांग जनतेच्या विकासाकरता 81 हजार 637 रुपये, तसेच शिवाजी उद्यानवन राष्ट्रीय महामार्गा जवळ एअरक्राफ्ट बसवण्यासाठी 1 कोटी 25 लाखाची विशेष तरतूद करण्यात आल्याची माहिती सभापती महोदयांनी दिली. पुढे बोलताना सभापती म्हणाले मुनिसिपल हायस्कूल नवीन बिल्डिंग बांधकामा करता 1 कोटी 50 लाखाचा निधी देण्यात येईल. शहरातील चौकाचे सुशोभिकरण करण्याकरता 25 लाखाचा निधी देण्यात येईल. राजा शिवछत्रपती सांस्कृतिक भवन येथे फर्निचर करीता 20 लाख रुपये, मुन्सिपल हायस्कूलच्या कंपाउंड भिंती करीता 25 लाख रुपये, सफाई कर्मचाऱ्यांकरता विश्रांती गृह बांधणी करतात 10 लाख रुपयांची तरतूद, दत्त खुले नाट्यगृह येथे मिनी फिल्टर प्लांट निर्माण करणे व सुशोभीकरणासाठी 52 लाख रुपये, निपाणी शहरातील जनतेला कोणत्याही भागांमध्ये जाण्यासाठी दिशादर्शक फलक असणे गरजेचे असल्यामुळे त्यासाठी 10 लाखाची विशेष तरतूद केल्याचे सभापतींनी सांगितले तसेच शेवटी इतर खर्च, नवीन कामाचे खर्च व अधिकचा खर्च म्हणून जवळजवळ 8 कोटीचा खर्च अपेक्षित धरून, या सर्व गोष्टींच्या मेंटेनन्स साठी 21 कोटी 61 लाख 26 हजार 876 रुपये खर्च अपेक्षित धरून एकूण खर्च 42 कोटी 76 लाख 94 हजार 748 रुपये धरून आरंभी शिल्लक जमा धरता एकूण 19 लाख 13 हजार 841 रुपयाचे शिलकी अंदाजपत्रक सादर केले. व हे सादर करताना मला आनंद होत असून या अंदाज पत्रकामध्ये भविष्यात येणाऱ्या जल संकटांना तोड देण्यासाठी वेळेत सुरुवात करण्याची तरतूद केलेली असल्याचे सांगितले. तसेच नवीन वर्षाच्या या अंदाज पत्रकामध्ये जनतेवर कोणताही अतिरिक्त बोजा न घालता शहरांमध्ये नवीन कामाची तरतूद केल्याचे सांगण्यास देखील सभापती विसरले नाहीत.

अंदाजपत्रक बैठकीस सर्व नगरसेवक नगरसेविका पालिका कर्मचारी नगरपालिका सर्व विभागातील अधिकारी वर्ग शासन नियुक्त नगरसेवक नगरसेविका यांच्या उपस्थितीमध्ये सन 2025-26 शिलकी अंदाजपत्रक सादर केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!